''यह एक शैक्षिक ब्लॉग है, यहाँ बालक-पालक-शिक्षक आदि के लिए उपयुक्त जानकारी है. आपसे अनुरोध है कि जहाँ आवश्यकता है वहाँ तक पहुँचाने में सहायता करें।"

स्वागत

'मच्छिंद्र बापू भिसे, शिक्षण सेवक, जिला परिषद् हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर द्वारा हार्दिक स्वागत! संपर्क 9730491952 "

१०. पंडिता रमाबाई (7th - Marathi)

   

१०. पंडिता रमाबाई

डॉ. अनुपमा उजगरे (जन्म-१९४९) प्रसिद्ध लेखिका. 'सांगी', 'पश्चात' हे काव्यसंग्रह; 'चांदणचुरा'; ललितलेखसंग्रह; 'पंडिता रमाबाई', 'लक्ष्मीबाई टिळक', 'विष्णुशास्त्री चिपळूणकर' इत्यादी चरित्रात्मक लेखन तसेच महाराष्ट्राचा खाट्यसंस्कृती कोश प्रसिद्ध.

स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केले आहे.

कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलावली होती, ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. पंडिता रमाबाईंना त्या वेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले. बंगालीतून त्याचा अनुवाद त्या वेळी करण्यात आला. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना, एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भदेऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते, ही घटनाच फार आगळीवेगळी होती.

आई, वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे, हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिनबिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. त्या वेळी त्यांचे वय बावीस वर्षांचे म्हणजे त्या वेळच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते.

विवाहानंतर दोन वर्षांच्या आतच बिपिनबाबूंचे निधन झाले. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. 'बाईमाणूस बोलते तरी कशी, हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. 'व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानांच्या निमंत्रणपत्रिकेत एक अटच घातलेली असे.' अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवली आहे.

स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली.

अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला; पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे, हा विचारच काहींना पटला नाही. एका उदार गृहस्थाने दहा हजार रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे चाळीस हजार रुपयांत होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली.

'मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदुमात्र आहे, तेथपर्यंत आपल्या स्त्री-जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराङ्मुख होणार नाही. स्त्री-जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे.' रमाबाईंच्या ह्या उद्‌गारांवरून त्यांना एकूणच स्त्री-जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती, हे दिसून येते.

रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली. पंडिता रमाबाईंनी 'मुक्तिमिशन'ची स्थापना केली. 'मुक्तिमिशन' मध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एकेक लहान उद्योग-व्यवसाय सुरू केले. केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्चा विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई-बैलांचे खिल्लार, शेळ्या-मेंढ्यांची चरणी, म्हशींचा गोठा, दूधदुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी-मैल्यापासून खत, भांड्यांवर नावे घालणे, भांड्यांना कल्हई करणे, हातमागावर कापड-सतरंज्या विणणे, घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाइप जुळवणे सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे-पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम... असे कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रिया करत. ही त्या काळी फारच नवलाईची गोष्ट ठरली. अडीच हजार लोक बसू शकतील असे प्रार्थनामंदिर (चर्च) बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही. श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच दिला.

रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षांची आणि संकटांची एक दीर्घ साखळी होती; पण त्या खचल्या नाहीत. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई ह्या सहस्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सत्शील साध्वी होत्या. त्या अशा सूर्यकन्या होत्या, ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले; पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्यांचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्ये उजळवून टाकली !


“पंडिता रमाबाई” या पाठाचा हिंदी अनुवाद


🌸 १०. पंडिता रमाबाई

कोलकाता शहर में देशभक्त आनंद मोहन ने स्त्रियों के लिए जो विशेष सभा आयोजित की थी, वह भारत में स्त्रियों की पहली सभा थी। पंडिता रमाबाई को उस समय बंगाली भाषा नहीं आती थी, इसलिए उन्होंने अपनी मातृभाषा जैसी प्रिय संस्कृत भाषा में भाषण दिया। उस समय उसका बंगाली में अनुवाद किया गया। यह सभा कई दृष्टियों से विशेष थी — स्त्रियों की पहली सभा, पहली स्त्री वक्ता और प्रस्तुत किया गया पहला मौखिक अनुवाद। जब स्त्रियों को शिक्षा से वंचित रखा जा रहा था, तब एक परदेश की, दूसरी भाषा बोलनेवाली स्त्री महाभारतकालीन संदर्भ देकर स्त्रियों की सभा में जागृति लाती है – यह घटना बहुत अनोखी थी।

माता, पिता और भाई की मृत्यु के बाद अकेले जीवन कितना कठिन होता है, यह अनुभव करने के बाद रमाबाई ने विवाह करने का निर्णय लिया। बहुत ही विद्वान वकील बिपिनबिहारी मेधावी से उन्होंने विधिपूर्वक विवाह किया। उस समय उनका उम्र 22 वर्ष था, जो उस समय की परंपराओं के अनुसार बहुत अधिक माना जाता था।

विवाह के दो वर्षों के भीतर ही बिपिनबाबू का निधन हो गया। महाराष्ट्र के सुधारकों के निवेदन पर रमाबाई अपनी नवजात बेटी के साथ पुणे आईं। उनका पहला व्याख्यान न्यायमूर्ति रानडे के घर हुआ। वहां तय हुआ कि प्रत्येक सप्ताह वे किसी न किसी के घर व्याख्यान देंगी। “स्त्री बोलती कैसे है, यह देखने की उत्सुकता हर पुरुष में थी।” उनके व्याख्यानों के निमंत्रण पत्र में यह शर्त होती कि – “जो व्याख्यान में आएगा, उसे घर की एक स्त्री को साथ लाना अनिवार्य होगा।” ऐसा उल्लेख सभा में अपने ससुर के साथ गईं काशीबाई कानिटकर ने किया है।

“स्त्रियों को पढ़ना और पढ़ाना चाहिए, इसके लिए मातृभाषा का सटीक ज्ञान आवश्यक है। शिक्षिका के रूप में खड़े होने के लिए स्त्रियों को छात्रवृत्तियाँ दी जानी चाहिए।” ऐसी सिफारिश उन्होंने हंटर कमिशन के सामने की।

अनाथ, अपंग और विधवा स्त्रियों की सेवा कर उन्हें स्वावलंबी बनाने के उद्देश्य से कार्य करने का निश्चय रमाबाई ने पुणे, मुंबई और अहमदाबाद के नेताओं और धनवानों को बताया। लेकिन कुछ लोगों को यह कार्य आवश्यक नहीं लगा। एक उदार व्यक्ति ने दस हजार रुपये देते हुए यह शर्त रखी कि – “आप इस राशि में से चालीस हजार का कार्य करके दिखाइए।”

“मुझे भारत की सभी स्त्रियाँ समान लगती हैं। जब तक मेरे शरीर में रक्त की एक बूँद भी शेष है, तब तक मैं स्त्रियों के कल्याण और सुधार के कार्य से पीछे नहीं हटूँगी। स्त्री जाति के सुधार का व्रत मैंने लिया है।” रमाबाई के इन शब्दों से यह स्पष्ट होता है कि उन्हें स्त्रियों के प्रति अत्यधिक प्रेम था और उनके दुःख दूर करने के लिए गहरी तड़प भी।

रमाबाई की पुत्री मनोरमा ने विदेश से ब्रेल लिपि सीखकर आने के बाद, नेत्रहीन स्त्रियों की शिक्षा की सुविधा भी उपलब्ध कराई। पंडिता रमाबाई ने ‘मुक्तिमिशन’ की स्थापना की। इसमें प्राथमिक शिक्षा देकर लड़कियों को स्वावलंबी बनाते समय उन्होंने कई छोटे उद्योग-व्यवसाय भी शुरू किए – जैसे केले की छाल से टोकरियाँ बनाना, सूत की डोरियाँ बनाना, बेंत की कुर्सियाँ बनाना, लेस, स्वेटर, मोज़े बुनना, गाय-बैलों के लिए चारा लाना, बकरियाँ चराना, भैंसों का तबेला, दूध-दही, मुर्गीपालन, गंदे पानी से खाद बनाना, बर्तनों पर नाम लिखना, बर्तनों की कलई करना, हथकरघे पर कपड़ा बुनना, तेल निकालना, छपाई का काम, चित्र छापना, कागज़ मोड़ना-पुस्तक बाँधना, अस्पताल चलाना, धोबी का काम इत्यादि। उस समय स्त्रियों द्वारा इन कार्यों को करना एक बहुत ही नई और अनोखी बात थी।

ढाई हजार लोगों की क्षमता वाला प्रार्थनामंदिर (चर्च) बनाते समय रमाबाई ने स्वयं उसका नक्शा तैयार किया और सिर पर ईंटों की टोकरी उठाकर निर्माण कार्य में भी सहयोग किया। उन्होंने किसी भी काम को करने में कभी हीनता महसूस नहीं की। अपने कर्म से उन्होंने आश्रम की लड़कियों को श्रम की प्रतिष्ठा का पाठ पढ़ाया।

पंडिता रमाबाई का जीवन संघर्षों और संकटों की एक लंबी श्रृंखला था, परंतु वे कभी निराश नहीं हुईं। स्त्री को एक स्वतंत्र व्यक्ति मानकर उसके विकास के लिए काम करनेवाली रमाबाई सहस्राब्दि की एकमात्र कर्मयोगिनी और सच्चरित्र साध्वी थीं। वे ऐसी सूर्यकन्या थीं जिनके भाग्य में अपने ही तेज़ से झुलसना लिखा था; लेकिन उन्होंने कई उजाड़ जीवनों को नंदनवन बना दिया और अंधेरे जीवनों को रौशनी से भर दिया।




पंडिता रमाबाई’ या पाठावर आधारित प्रश्नोत्तरे

🟢 1.  प्रश्नोत्तरे

प्रश्न 1: कोलकाता येथे स्त्रियांची पहिली सभा कुणी बोलावली होती?
उत्तर: कोलकाता येथे स्त्रियांची पहिली सभा देशभक्त आनंद मोहन यांनी बोलावली होती.

प्रश्न 2: रमाबाईंनी कोणत्या भाषेत भाषण केले?
उत्तर: रमाबाईंनी संस्कृत भाषेत भाषण केले.

प्रश्न 3: रमाबाईंनी कोणाशी विवाह केला?
उत्तर: रमाबाईंनी बिपिनबिहारी मेधावी यांच्याशी विवाह केला.

प्रश्न 4: 'मुक्तिमिशन'ची स्थापना कुणी केली?
उत्तर: 'मुक्तिमिशन'ची स्थापना पंडिता रमाबाईंनी केली.


🟢 2. प्रश्‍न – उत्तरे (लघु उत्तरे)

प्रश्न 1: रमाबाईंनी 'हंटर कमिशन'कडे कोणती शिफारस केली?
उत्तर: स्त्रियांना मातृभाषेचे ज्ञान मिळावे, शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी शिष्यवृत्त्या द्याव्यात, अशी शिफारस रमाबाईंनी केली.

प्रश्न 2: रमाबाई पुण्यात का आल्या?
उत्तर: बिपिनबिहारींच्या निधनानंतर महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या.

प्रश्न 3: काशीबाई कानिटकरांनी पंडिता रमाबाईंच्या व्याख्यानांबद्दल काय लिहिले?
उत्तर: ‘प्रत्येक व्याख्यानाला येणाऱ्याने एका स्त्रीला सोबत आणले पाहिजे’ ही अट निमंत्रणपत्रिकेत असल्याचे त्यांनी लिहिले.


🟢 3. दीर्घ उत्तरे

प्रश्न 1: ‘पंडिता रमाबाई’ या स्त्रीच्या कार्याची थोडक्यात माहिती लिहा.
उत्तर: पंडिता रमाबाई या एक पराक्रमी, शिक्षित व समाजसुधारक स्त्री होत्या. त्यांनी पहिल्या स्त्री सभा, व्याख्याने, स्त्रियांसाठी संस्था, शाळा व ‘मुक्तिमिशन’ची स्थापना केली. त्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटल्या. विधवा, अनाथ, अपंग स्त्रियांसाठी त्यांनी उद्योगधंद्यांची सुरुवात केली. त्यांनी शिष्यवृत्त्या मिळाव्यात म्हणून हंटर कमिशनकडे शिफारस केली. श्रमप्रतिष्ठा, आत्मनिर्भरता, स्वाभिमानाचे धडे त्यांनी कृतीतून दिले.


🟢 4. योग्य पर्याय निवडा (बहुपर्यायी प्रश्न)

प्रश्न 1: पंडिता रमाबाई यांचा विवाह कोणा सोबत झाला?
a) आनंद मोहन
b) बिपिनबिहारी मेधावी ✅
c) रानडे
d) चिपळूणकर

उत्तर: b) बिपिनबिहारी मेधावी

प्रश्न 2: ‘मुक्तिमिशन’ मध्ये कोणते कार्य केले जात होते?
a) शेती
b) चित्रकला
c) स्वावलंबनासाठी विविध उद्योग ✅
d) फक्त शिक्षण

उत्तर: c) स्वावलंबनासाठी विविध उद्योग


🟢 5. योग्य शब्द भरावा (रिक्त जागा भरा)

  1. पंडिता रमाबाईंनी ‘मुक्तिमिशन’ ची स्थापना केली.

  2. रमाबाईंनी आपले पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी दिले.

  3. रमाबाईंच्या कन्येचे नाव मनोरमा होते.

  4. अडीच हजार लोक बसतील असे प्रार्थनामंदिर त्यांनी बांधले.


🟢 6. कोण म्हणाले / लिहिले?

प्रश्न: "आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही" – हे कोण म्हणाले?
उत्तर: पंडिता रमाबाई


🟢 7. कृतीवर आधारित उपक्रम

उपक्रम 1: ‘मुक्तिमिशन’मध्ये केले गेलेले उद्योगधंदे एका तक्त्यामध्ये नोंदवा.
उपक्रम 2: ‘पंडिता रमाबाई यांचे कार्य’ या विषयावर 5 ओळींचा परिच्छेद लिहा.
उपक्रम 3: पंडिता रमाबाईंच्या जीवनावर एक पोस्टर तयार करा.
उपक्रम 4: ‘स्त्रियांचे सक्षमीकरण’ या विषयावर एक भाषण लिहा व सादर करा.



संकल्पना, प्रस्तुति, संपादन एवं लेखन

● मच्छिंद्र बापू भिसे 'मंजीत'● ©®
शिक्षण सेवक
जिला परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर, जिला गोंदिया (महाराष्ट्र)
9730491952
सातारा (महाराष्ट्र)

-०-

No comments:

Post a Comment