
आशा पाटील (जन्म-१९७६) प्रसिद्ध लेखिका. 'आठवणींचा पाऊस', 'बिल्वदल' हे काव्यसंग्रह; 'अमृतफळ', 'आत्मनाद', 'बंटीची फजिती', 'शूर वीर', 'पाखरं', 'शेवंताबाई' इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध.
सोनालीने अवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने केलेली युक्ती कशी सफल झाली, याचे वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठात केले आहे.
आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते. टीव्ही, व्हिडिओ गेम्स, कॉम्प्युटर, मोबाईल या सर्वांशी त्यांची मैत्री पक्की झाली आहे. खरेतर सोनालीलाही पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तक वाचनाची बिलकूल आवड नव्हती. तिची आई अन् मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे, तर वाचनाचे वेडच होते. तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान दोन पाने अवांतर वाचावीत, असे तिचे मत होते. खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते.
एकदा सुट्टीमध्ये तिच्या आईने एक गोष्टींचे पुस्तक तिच्या हातात दिले अन् तिला सांगितले, "सोनाली, मला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलवलं आहे. तिथे मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहे. मला खूप काही गोष्टी माहीत आहेत; पण कोणती गोष्ट सांगू ते समजेना. या पुस्तकातली एक गोष्ट सांगावी असं वाटतंय. तू यांतली एक छानशी गोष्ट मला निवडून दे. मी तीच गोष्ट शाळेत सांगेन."
आईला मदत म्हटल्यावर सोनालीला शाळेत बाईंनी सांगितलेले आठवले. 'आपण सर्वांना मदत केली पाहिजे. या मदतीची सुरुवात घरापासून करा. मदत करण्याने आपल्याला तर आनंद होतोच; पण दुसऱ्याचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो. तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करता, त्याची नोंद ठेवा आणि ती दर शनिवारी दाखवा.'
सोनालीने आतापर्यंत बऱ्याच नोंदी वहीत केल्या होत्या. आईला मदत, ही एक नवीन नोंद होईल, बाईदेखील सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील, शाबासकी देतील या विचाराने तिने पटकन 'हो' म्हणून आईच्या हातातले पुस्तक घेतले.
आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या. नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळेना. शेवटी तिने नाइलाजाने एक-एक करून जवळ जवळ दहा कथा वाचल्या. अवघ्या एक-दीड तासात सारे पुस्तक वाचून झाले. खरेतर प्रथम तिला हे फारच कंटाळवाणे वाटले होते; पण जसजशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली, तसतशी तिला पुढची कथा काय आहे, त्यात काय लिहिले आहे, याविषयी उत्सुकता वाटू लागली. त्यानंतर तिने पुस्तक केव्हा संपवले, हे तिलाच कळले नाही.
कथा तर सगळ्याच आवडल्या, त्यांतली कोणती निवडावी ते समजेना. ती आईकडे गेली व आपल्या समोरील समस्या सांगितली. मग आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यास सांगितले. सोनालीला प्रथम हे काम सोपे वाटले; पण एक-दोन कथांनंतर पुढच्या कथेत काय आहे हे पटकन आठवेचना. तिने आईला 'मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते' म्हणून सांगितले. खरेतर आज घरात आजी, आजोबा, बाबा, दादा, काकू, काका या साऱ्यांनाच सोनालीकडे पाहून नवल वाटत होते.
आता तिने एक पान घेतले, त्या पानावर कथेचे नाव अन् त्या कथेत काय सांगितले आहे ते थोडक्यात लिहिले. बघता बघता तिचे पान भरले होते. ती पळतच आईकडे गेली अन् तिने आईला ते पान दाखवले. आईला ते सारे पाहून तिचे खूप कौतुक वाटले. आईने तिचे घरातल्या साऱ्यांपुढे कौतुक केल्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नव्हता.
शाळेत गेल्यानंतर तिने आपण काल आईला काय आणि कशी मदत केली ते सांगितले आणि सोबत एक कथाही ऐकवली. तिने आजपर्यंत कधीच अवांतर वाचन केले नव्हते. तिच्यातला हा आमूलाग्र बदल सर्वांना आनंद देणारा होता. वर्गात प्रथम बाईंनी, आईला मदत केली म्हणून अभिनंदन केले आणि नंतर तिने वर्गात एवढी छान गोष्ट सांगितली म्हणून कौतुकाने तिच्या पाठीवर शाबासकी दिली.
सोनालीला आज खूप खूप आनंद झाला होता. तिने आता घरातल्या, शाळेच्या वाचनालयातल्या अनेक पुस्तकांचे वाचन करायचे ठरवले होते. आईने सांगितल्याप्रमाणे तिने एक वही केली होती. त्यामध्ये ती आवडलेल्या ओळी किंवा एखादा प्रसंग लिहून ठेवत असे. सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले आणि सोबत तिच्या वर्गातील साऱ्याच मुलामुलींना एकेक पुस्तक भेट स्वरूपात दिले. सोनालीला आता 'पुस्तक वाचत जा,' असे सांगण्याची गरजच उरली नव्हती.
📘 वाचनाचे वेड (हिंदी अनुवाद)
पाठ का नाम: पढ़ने का शौक
आजकल के बच्चों को पढ़ना एक बोरिंग चीज़ लगती है। टीवी, वीडियो गेम्स, कंप्यूटर और मोबाइल – इन सबसे उनकी अच्छी दोस्ती हो गई है। दरअसल, सोनाली को भी पाठ्यपुस्तकों के अलावा दूसरी किताबें पढ़ने में बिल्कुल रुचि नहीं थी। लेकिन उसकी माँ और बड़ा भाई तो पढ़ने के इतने शौकीन थे कि जैसे उन्हें पढ़ने की दीवानगी ही थी।
उसकी माँ ने कई बार उसे पढ़ाई की ओर आकर्षित करने की कोशिश की। उसका मानना था कि पढ़ाई के अलावा हर दिन कम से कम दो पन्ने अतिरिक्त (अवांतर) पढ़ना चाहिए। बहुत कोशिशों के बावजूद भी सोनाली को अतिरिक्त पढ़ने के लिए प्रेरित करने में माँ को सफलता नहीं मिल रही थी।
एक बार छुट्टियों में, उसकी माँ ने उसके हाथ में एक कहानी की किताब दी और कहा, "सोनाली, मुझे एक स्कूल में मेहमान के रूप में बुलाया गया है। वहाँ मुझे बच्चों को एक कहानी सुनानी है। मुझे तो बहुत सारी कहानियाँ आती हैं, लेकिन कौन-सी कहानी सुनाऊं ये समझ नहीं आ रहा। मुझे लगता है इस किताब की कोई एक अच्छी कहानी सुनानी चाहिए। तुम इसमें से कोई अच्छी-सी कहानी चुनकर मुझे दो, वही मैं बच्चों को सुनाऊँगी।"
माँ की मदद करने की बात आई तो सोनाली को स्कूल की टीचर की बात याद आई – “हमें सबकी मदद करनी चाहिए, और मदद की शुरुआत घर से ही होनी चाहिए। मदद करने से हमें खुशी मिलती है और दूसरों की खुशी से हमें संतोष मिलता है। तुम घर या अन्य जगहों पर कहाँ-कहाँ मदद करते हो, उसकी सूची बनाओ और हर शनिवार को दिखाओ।”
सोनाली ने पहले ही कई बार अपनी मदद की घटनाएँ कॉपी में लिख रखी थीं। माँ की मदद – यह एक नई घटना होगी, और टीचर क्लास में सबके सामने उसकी तारीफ भी करेंगी – इस सोच से उसने तुरंत "हाँ" कहा और माँ के हाथ से किताब ले ली।
माँ द्वारा दी गई किताब में छोटी-छोटी कहानियाँ थीं। केवल नाम पढ़कर कौन-सी कहानी चुननी है, यह सोनाली को समझ नहीं आ रहा था। अंत में, मजबूरी में उसने एक-एक करके लगभग दस कहानियाँ पढ़ डालीं। केवल डेढ़ घंटे में पूरी किताब पढ़कर खत्म कर दी।
असल में, शुरुआत में उसे यह काम बहुत बोरिंग लग रहा था। लेकिन जैसे-जैसे वह कहानियाँ पढ़ने लगी, उसे जिज्ञासा होने लगी कि अगली कहानी क्या है, उसमें क्या लिखा है। धीरे-धीरे उसे पढ़ने में मज़ा आने लगा और उसे पता ही नहीं चला कि कब पूरी किताब पढ़ डाली।
उसे सारी कहानियाँ पसंद आईं, लेकिन कौन-सी चुने – यह तय नहीं कर पा रही थी। वह माँ के पास गई और अपनी परेशानी बताई। तब माँ ने उसे हर कहानी का सारांश (थोड़े में कहानी का मतलब) एक पन्ने पर लिखने को कहा।
सोनाली को यह काम शुरू में आसान लगा, पर दो-तीन कहानियों के बाद उसे आगे की कहानी याद नहीं आ रही थी। उसने माँ से कहा – "मैं फिर से एक बार किताब पढ़ लेती हूँ।" आज घर में दादी, दादा, पापा, भैया, चाची, चाचा – सबको सोनाली की यह बात देखकर बहुत आश्चर्य हो रहा था।
अब उसने एक पन्ना लिया, उस पर कहानी का नाम और उस कहानी में क्या बताया गया है – यह संक्षेप में लिखा। देखते-देखते उसका पूरा पन्ना भर गया। वह दौड़ती हुई माँ के पास गई और वह पन्ना दिखाया। माँ को यह देखकर बहुत अच्छा लगा। माँ ने पूरे परिवार के सामने सोनाली की तारीफ की, जिससे सोनाली बहुत खुश हो गई।
स्कूल में जाकर उसने बताया कि कल उसने माँ की कैसे मदद की और साथ में एक कहानी भी सुनाई। उसने आज तक कभी अतिरिक्त पढ़ाई नहीं की थी। उसमें आया यह बदलाव सबके लिए खुशी देने वाला था। क्लास में टीचर ने पहले माँ की मदद करने के लिए सोनाली को बधाई दी और फिर इतनी अच्छी कहानी सुनाने के लिए उसकी पीठ थपथपाई।
सोनाली आज बहुत-बहुत खुश थी। अब उसने तय किया था कि घर और स्कूल की लाइब्रेरी की कई सारी किताबें वह पढ़ेगी। माँ ने जैसा कहा था, उसने एक कॉपी बनायी थी जिसमें वह पसंद की गई पंक्तियाँ और प्रसंग लिखती थी। सोनाली को प्रोत्साहित करने के लिए पापा ने उसके जन्मदिन पर उसे एक सुंदर किताब भेंट दी और साथ ही उसके पूरे क्लास के बच्चों को भी एक-एक किताब भेंट दी।
अब सोनाली को यह कहने की ज़रूरत ही नहीं थी – "पढ़ाई करो!" क्योंकि वह खुद ही अब पढ़ने की शौकीन बन चुकी थी।
'वाचनाचे वेड' या पाठावर आधारित प्रश्नोत्तरे
🔹 अ) प्रश्नोत्तर
1. सरळ उत्तरे लिहा:
-
सोनालीला वाचनाची आवड होती का?➤ नाही, सुरुवातीला तिला पाठ्यपुस्तकांशिवाय वाचायला आवड नव्हती.
-
सोनालीच्या आईने तिला काय काम दिले?➤ आईने गोष्टींच्या पुस्तकातून एक चांगली गोष्ट निवडायला सांगितली.
-
सोनालीने आईला मदत का करायचे ठरवले?➤ शाळेत बाईंनी मदत करायला शिकवले होते आणि मदत केल्याने शाबासकी मिळेल असे वाटले म्हणून.
-
सोनालीने पुस्तकातील किती कथा वाचल्या?➤ जवळजवळ दहा कथा वाचल्या.
-
बाबांनी सोनालीच्या वाढदिवसाला काय भेट दिली?➤ एक छानसे पुस्तक आणि तिच्या वर्गातील प्रत्येकासाठी एकेक पुस्तक.
2. विस्तृत उत्तरे लिहा:
-
सुरुवातीला सोनालीची वाचनाविषयीची भूमिका काय होती?➤ सुरुवातीला सोनालीला फक्त पाठ्यपुस्तके वाचायला आवडत होती. तिला अवांतर वाचन कंटाळवाणे वाटायचे.
-
सोनाली वाचनात कशी रमली?➤ आईने तिला गोष्ट निवडायचे काम दिल्यावर तिने कथा वाचण्यास सुरुवात केली. जसजशा कथा वाचत गेली, तसतशी तिची उत्सुकता वाढली आणि वाचनात रमली.
-
आईने सोनालीकडून गोष्ट निवडण्यासाठी काय सुचवले?➤ आईने तिला प्रत्येक कथेचा सारांश एका पानावर लिहून काढायला सांगितले.
-
सोनालीच्या वाचनवेडाचे घरातल्या लोकांनी कसे कौतुक केले?➤ सगळ्यांनी तिला गौरवले, आईने सगळ्यांसमोर कौतुक केले आणि बाबांनी वाढदिवसाला पुस्तक भेट दिले.
🔹 ब) योग्य शब्द निवडा:
-
सोनालीला वाचनाची (आवड / नावड) होती.➤ नावड
-
सोनालीच्या आईला वाचनाचे (वेड / कंटाळा) होता.➤ वेड
-
सोनालीने (दोन / दहा) कथा वाचल्या.➤ दहा
-
शाळेत बाईंनी (मदत / शिक्षा) करण्याची शिकवण दिली होती.➤ मदत
-
सोनालीच्या वाढदिवसाला तिला (खेळणी / पुस्तक) भेट मिळाले.➤ पुस्तक
🔹 क) खालील शब्दांचे अर्थ लिहा:
| शब्द | अर्थ (हिंदीमध्ये) |
|---|---|
| वाचन | पढ़ाई / पठन |
| आवड | रुचि |
| गोष्ट | कहानी |
| मदत | सहायता |
| कौतुक | प्रशंसा |
| सारांश | संक्षिप्त रूप से विवरण |
| प्रोत्साहन | उत्साहवर्धन |
| वाढदिवस | जन्मदिन |
🔹 ड) उपक्रम (Activities)
-
तुम्ही केलेली मदत:– मागील आठवड्यात तुम्ही कोणाला आणि कशी मदत केली ते दोन ओळींत लिहा.
-
माझे आवडते पुस्तक:– तुम्ही आवडलेल्या पुस्तकाचे नाव लिहा आणि का आवडले ते लिहा.
-
सारांश लेखन:– ‘वाचनाचे वेड’ या धड्याचा संक्षेप 5 वाक्यांत लिहा.
-
चित्रकला:– सोनाली पुस्तक वाचत आहे, अशा प्रसंगाचे चित्र रंगवून दाखवा.
-
वाचन सत्र:– शाळेत दर आठवड्याला एक दिवस ‘वाचन दिवस’ ठरवा. प्रत्येकाने त्यादिवशी एक गोष्ट वाचून सांगायची.

No comments:
Post a Comment