
४. गोपाळचे शौर्य
लक्ष्मीकमल गेडाम (जन्म-१९५६) : लेखिका, कवयित्री, कथाकथनकार, 'शिवाफेरी', 'दुरून डोंगर साजरे', 'पितरांचं पात्र', 'अडोसा' हे कथासंग्रह; 'हृदयपरिवर्तन', 'किशोरांची करामत' हे बालसाहित्य; 'तुरुंगवाडा' ही कादंबरी; 'आठवांचे झेले' हा ललितलेखसंग्रह प्रसिद्ध.
डोंगरावर अचानक लागलेला वणवा व त्याची आग विझवण्यासाठी गोपाळने केलेले प्रयत्न याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे. गोपाळ या शालेय विद्यार्थ्याच्या शौर्याची ही कथा आहे.
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेले मोहदी हे खेडेगाव. गावातील सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात. या गावापासून आठ-दहा किलोमीटर अंतरावर 'कर्णागड' नावाचा एक पौराणिक गड आहे. गुरे चारणारे गुराखी दररोजच तिथे जातात. सहल काढणारे, ट्रेकिंगप्रेमी हेसुद्धा अधेमधे तिथे जाताना दिसतात.
गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी बारमाही झुळझुळत असते. नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतमळे बारा महिने हिरवेगार असतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर हा प्रदेश पाचूचा वाटतो. उन्हाळ्यात गडावर वाळलेला पाला-पाचोळा दिसतो. तरीही रानमेव्याची अनेक प्रकारची झाडे तिथे मोसमी फळभाराने लदबदलेली असतात.
वार्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेचच उन्हाळ्यात मोहदी येथील माध्यमिक शाळेची सहल कर्णागड येथे गेली होती. विद्यार्थी, शिक्षक या सर्वांनी गडाचा भव्य परिसर पाहिला. गडावरील फेरफटका पूर्ण झाल्यावर प्रत्येकाने आपापले कलागुण सादर केले. विद्यार्थ्यांचा संपूर्ण दिवस छान मजेत गेला. सर्व मुले गड उतरून खाली आली.
'मुलांनो, सूर्यास्ताआधी घरी पोहचलेलं बरं!' असे शिक्षकांनी म्हणताच सर्वजण गाडीत जाऊन बसले.
घाटातून गाडी जात असताना, मुलांना घाटाच्या खालच्या बाजूने आग लागलेली दिसली. "अरे, तो बघा वणवा ! वणवा लागलाय, वणवा !" गाडीतील एकजण ओरडला.
ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला. नाहक आपण आगीत सापडू नये, हा त्याचा उद्देश होता. गाडी पायथ्याशी येत असताना उतारामुळे गाडीचा वेग मंदावला. 'गाडी थांबवा ! ही आग विझवलीच पाहिजे." चौदा वर्षांचा गोपाळ ओरडला. गोपाळच्या या वक्तव्यावर गाडीतील सारेजण हसले.
"अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू?" शिक्षक दरडावून म्हणाले; पण ते ऐकायला गोपाळ गाडीत होताच कुठे? त्याने तर लगेच गाडीतून उडीही मारली होती. त्याला परत गाडीत घेण्यासाठी ड्रायव्हरलाही नाइलाजाने गाडी थांबवावी लागली.
गोपाळने धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाइप सर्व शक्तीनिशी ओढायला सुरुवात केली. साधारणपणे अडीच-तीन इंच परीघ असलेला तो लांबच लांब पाइप गोपाळ आगीच्या दिशेने ओढत आणत होता.
"ये आग एकट्याकडून इझणार नाईच. हे मलेही माईत हाये, पन म्हनून काय परेतनंच करावं न्हाई का काय? सर, असं जंगलंच आम्हां आदिवासींचे पोशिंदे हायेत. आं मायबापाले कोनी असं आगीच्या मुखी सोडून जातेत काय ?" बाजूला उभा असलेला गावातील एक गुराखी सरांना म्हणाला.
गोपाळ गुराख्याकडे पाहून म्हणाला, "माणसं असो का जनावरं त्यांना वाचवलंच पाहिजे ना! सर्वांनी मिळून आग विझवलीच पाहिजे." हे पाहून सर्व विद्यार्थी व शिक्षक एकापाठोपाठ एक गोपाळच्या मदतीला धावले.
एवढ्यात दुसरी एक गाडी गडावरून खाली उतरली. त्या गाडीतील पन्नाशीचे एक गृहस्थ खाली उतरले. त्यांनी सर्व प्रकार क्षणात न्याहाळला आणि त्यांनी मोबाईल कानाला लावला. मोबाईलवरील संभाषण संपताच ते गोपाळच्या मदतीलाही गेले. आता तो पाइप सहजगत्या चौफेर पाणी फेकू लागला.
पायथ्याची आग हळूहळू शांत होत होती. "गडावर पुढे पुढे पसरत असलेली आगही आटोक्यात आणली पाहिजे." दुसऱ्या गाडीतील गृहस्थ म्हणाले. "पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो." शिक्षक हतबल झाल्यासारखे बोलले. त्या गृहस्थाने फोनवरून अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांना बोलावून घेतले आहे हे सरांना सांगितले.
वीस मिनिटांच्या आतच पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नरखेडहून अग्निशामकदलाच्या दोन गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या. लगेच त्यांनी पाण्याचा मारा सुरू केला. आग आटोक्यात येऊन संपूर्णतः शांत झाली होती. आता सर्वांचेच चेहरे उजळले होते. सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली होती.
अशातच गाईवासरं घेऊन गेलेले काही गुराखी मुलांजवळ आले. त्यांतील एकजण हात जोडून म्हणाला, "लय बेस झालं बापा. आग इझली. गडावरचीतं कितीकंच झाडं झुडपं भाजून निघालीत. जरासा का उशीर झाला असता तं आम्हीही तसेच भाजून निघालो असतो. आनं आमच्यातं कोनाले पत्ता भी लागला नस्ता, तुम्ही समदं मदतीसं धावून आलेतं" हे सांगताना त्याला गहिवरून आले होते.
"खरंच, आमच्या या गोपाळनं निरपेक्ष भावनेनं, जिवाची पर्वा न करता हे धाडस केलं. आज केवळ गडच नव्हे, तर गुरं आणि या सर्व गुराख्यांचेही प्राण वाचले. त्याचं हे काम खरंच कौतुकास्पद आहे." असे मोठ्या अभिमानाने शिक्षक सर्वांना सांगत होते.
दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातून ही बातमी सर्वच लोकांना कळाली. परिसरातील नागरिक गोपाळच्या या शौर्याचे भरभरून कौतुक करत होते.
"गोपाळचे शौर्य" चा हिंदी अनुवाद
गोपाळ का साहस
नागपूर जिले के नरखेड तालुका में "मोहदी" नाम का एक गाँव है। इस गाँव के सभी लोग आपस में प्रेम और सौहार्द से रहते हैं। इस गाँव से आठ-दस किलोमीटर दूर "कर्णागढ़" नाम का एक पौराणिक किला है। इस गढ़ पर प्रतिदिन पशु चराने वाले चरवाहे जाते हैं। कभी-कभी पिकनिक मनाने वाले और ट्रेकिंग के शौकीन लोग भी वहाँ जाते रहते हैं।
गढ़ के नीचे मंदाकिनी नदी पूरे साल शांति से बहती रहती है। नदी के दोनों किनारों पर फैले खेत पूरे साल हरे-भरे रहते हैं। बारिश और सर्दियों में तो यह इलाका पन्ने जैसे हरे रंग से भरा हुआ नजर आता है। गर्मियों में वहाँ सूखे पत्ते और घास फैले होते हैं, लेकिन उस मौसम में भी जंगल के कई पेड़ मौसमी फलों से लदे रहते हैं।
वार्षिक परीक्षा के तुरंत बाद गर्मियों की छुट्टियों में मोहदी गाँव के माध्यमिक स्कूल की एक पिकनिक सहल (सैर) कर्णागढ़ गई थी। विद्यार्थियों और शिक्षकों ने मिलकर गढ़ का विशाल परिसर देखा। घूमने के बाद सभी ने अपने-अपने कला कौशल प्रस्तुत किए। सभी विद्यार्थियों का दिन हँसी-खुशी और मज़े में बीता। घूमकर सभी नीचे उतर आए।
"बच्चों, सूरज डूबने से पहले घर पहुँचना अच्छा रहेगा!" ऐसा कहते ही सभी शिक्षक बच्चों को गाड़ी में बैठने को बोले। सभी विद्यार्थी गाड़ी में बैठ गए।
गाड़ी जब घाट से नीचे उतर रही थी, तब विद्यार्थियों ने नीचे की ओर आग लगी हुई देखी। "अरे, देखो वहाँ जंगल में आग लग गई है!" गाड़ी में से किसी ने चिल्लाकर कहा।
ड्राइवर ने तुरंत गाड़ी की गति बढ़ा दी ताकि आग की चपेट में न आएं। जब गाड़ी गढ़ के नीचे पहुँची, तो ढलान होने के कारण उसकी गति थोड़ी धीमी हो गई। तभी चौदह साल का गोपाळ चिल्लाया, "गाड़ी रोकिए! ये आग तो बुझानी ही चाहिए!"
गोपाळ की इस बात पर गाड़ी में सभी लोग हँस पड़े। "अरे पगले, हम जंगल की इतनी बड़ी आग कैसे बुझा सकते हैं?" शिक्षक ने डाँटते हुए कहा। पर गोपाळ तो गाड़ी में रुका ही कहाँ था? वह तो पहले ही गाड़ी से कूद चुका था। उसे वापस लाने के लिए ड्राइवर को मजबूर होकर गाड़ी रोकनी पड़ी।
गोपाळ दौड़कर पास के खेत में गया, जहाँ से नदी से पानी लाने वाला रबड़ का पाइप चल रहा था। उसने पूरी ताकत से वह पाइप खींचना शुरू किया। लगभग ढाई-तीन इंच मोटा और लंबा वह पाइप गोपाळ धीरे-धीरे आग की दिशा में खींचता गया।
वहाँ खड़े गाँव के एक चरवाहे ने शिक्षक से कहा, "यह आग एक अकेले से नहीं बुझेगी, यह मुझे भी पता है। लेकिन इसका मतलब यह नहीं कि हम कोशिश ही न करें। सर, ये जंगल तो हमारे आदिवासियों के पालक हैं। कोई अपने माता-पिता को ऐसे आग में कैसे छोड़ सकता है?"
गोपाळ ने भी चरवाहे की ओर देखकर कहा, "चाहे इंसान हो या जानवर, उन्हें बचाना ही चाहिए। सभी को मिलकर ये आग बुझानी ही होगी।"
यह देखकर सभी विद्यार्थी और शिक्षक एक-एक करके गोपाळ की मदद के लिए आगे आए। उसी समय गढ़ से नीचे एक और गाड़ी उतर रही थी। उसमें से लगभग पचास साल के एक सज्जन नीचे उतरे। उन्होंने तुरंत सारी स्थिति समझ ली और अपने मोबाइल पर बात करने लगे। फोन खत्म होते ही वे भी गोपाळ की मदद के लिए पहुँच गए। अब पाइप से चारों ओर पानी का छिड़काव शुरू हो गया।
गढ़ के नीचे की आग धीरे-धीरे शांत हो रही थी। "गढ़ की ऊपरी ओर जो आग फैल रही है, उसे भी काबू में लाना चाहिए।" उन सज्जन ने कहा।
"लेकिन सर, ये कैसे संभव है? मुझे तो यह पागलपन ही लग रहा है।" शिक्षक ने चिंता से कहा। उस सज्जन ने उन्हें बताया कि उन्होंने अग्निशमन दल की दो गाड़ियों को बुला लिया है।
सिर्फ बीस मिनट में, पंद्रह-बीस किलोमीटर दूर नरखेड से अग्निशमन दल की दो गाड़ियाँ गढ़ के नीचे पहुँच गईं। तुरंत ही पानी की बौछार शुरू की गई। कुछ ही समय में आग पूरी तरह बुझ गई थी। अब सभी के चेहरे प्रसन्नता से दमकने लगे। सभी को एक नई ऊर्जा मिली थी।
इसी समय गाय-बछड़े चराने गए कुछ चरवाहे बच्चों के पास आए। उनमें से एक ने हाथ जोड़कर कहा, "बहुत अच्छा हुआ भाई, आग बुझ गई। गढ़ पर तो कई पेड़-पौधे जलकर खाक हो गए। अगर थोड़ी सी भी देर हो जाती, तो हम भी जलकर मर जाते। और किसी को हमारा पता भी नहीं चलता। आप सब हमारी मदद को दौड़े, उसके लिए बहुत धन्यवाद!" यह कहते-कहते उसकी आँखें भर आईं।
शिक्षक ने गर्व से कहा, "सचमुच, हमारे इस गोपाळ ने निःस्वार्थ भाव से, अपनी जान की परवाह न करते हुए यह साहसी कार्य किया। आज न केवल गढ़ बचा, बल्कि जानवर और सभी चरवाहों की जान भी बची। यह कार्य अत्यंत सराहनीय है।"
अगले दिन यह खबर अख़बारों के ज़रिए सभी लोगों को पता चली। पूरे इलाके के लोग गोपाळ के इस साहस की भूरि-भूरि प्रशंसा कर रहे थे।
‘गोपाळचे शौर्य’ या पाठावर आधारित प्रश्नोत्तर
🔹 अ. ज्ञानावर आधारित प्रश्न - (Knowledge-based Questions)
-
गोपाळ कोणत्या गावाचा रहिवासी आहे?उत्तर: गोपाळ नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोहदी गावचा रहिवासी आहे.
-
गडाचे नाव काय आहे?उत्तर: कर्णागड.
-
गोपाळचे वय किती होते?उत्तर: चौदा वर्षे.
-
गडाच्या पायथ्याशी कोणती नदी वाहते?उत्तर: मंदाकिनी नदी.
-
गोपाळने आग विझवण्यासाठी काय वापरले?उत्तर: पाण्याने भरलेला रबरी पाइप.
🔹 आ. समज व अर्थ लावणे. (Understanding - आकलनाधारित प्रश्न)
-
गोपाळने गाडी थांबवायला का सांगितले?उत्तर: कारण घाटाच्या खाली वणवा लागलेला दिसला आणि तो आग विझवायचा प्रयत्न करू इच्छित होता.
-
शिक्षकांनी सुरुवातीला गोपाळच्या कृतीबद्दल काय प्रतिक्रिया दिली?उत्तर: त्यांनी त्याला वेड्यात काढले आणि सांगितले की जंगलाची आग आपण कशी विझवणार.
-
गावातील गुराख्यांनी आग विझवण्यासाठी काय मत व्यक्त केले?उत्तर: त्यांनी सांगितले की जंगल हे आदिवासींचे पोशिंदा आहे, त्यामुळे आग विझवण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत.
🔹 इ. उपयोग आणि विश्लेषण (Application & Analysis)
-
गोपाळच्या धाडसामुळे कोणकोणाचे प्राण वाचले?उत्तर: गडावरील गुरं, गुराखी मुले आणि जंगलातील अनेक प्राणी वाचले.
-
जर गोपाळने गाडी थांबवली नसती, तर काय घडले असते?उत्तर: आग वाढली असती, गडावरील जीवितहानी झाली असती आणि जंगलाची खूप हानी झाली असती.
-
गोपाळने वापरलेला पाइप कसा होता?उत्तर: तो साधारणतः अडीच-तीन इंच परीघाचा लांबच लांब रबरी पाइप होता.
🔹 ई. चिंतन व विचारमंथन (Thinking & Reflection)
-
गोपाळने घेतलेला निर्णय योग्य होता का? तुमचे मत लिहा.उत्तर: (विद्यार्थ्यांचे उत्तर अपेक्षित. उत्तरात गोपाळचे धाडस, प्रसंगावधान, जबाबदारी यांचे मूल्यांकन असावे.)
-
गोपाळच्या धाडसामुळे आपल्याला कोणती शिकवण मिळते?उत्तर: संकटसमयी धैर्य, प्रसंगावधान आणि निस्वार्थपणा या गुणांचे महत्त्व समजते.
-
तुम्ही गोपाळच्या जागी असता, तर काय केलं असतं?उत्तर: (स्वतंत्र उत्तर अपेक्षित.)
🔹 उ. भाषिक व सृजनात्मक उपक्रम (Language & Creative Tasks)
-
गोपाळवर आधारित लघुकथा लिहा.
-
‘जंगलाची आग’ या विषयावर १० ओळींचा निबंध लिहा.
-
गोपाळच्या शौर्याची बातमी वर्तमानपत्रात छापण्यासाठी मथळा (हेडलाईन) लिहा.
-
‘माझा आदर्श’ या विषयावर गोपाळच्या उदाहरणाने लेख लिहा.
🔹 अतिरिक्त – शब्दार्थ / शब्दसंपदा
| मराठी शब्द | अर्थ |
|---|---|
| वणवा | जंगलाची आग |
| पायथ्याशी | डोंगराच्या तळाशी |
| झुळझुळणे | सतत वहाणे |
| लदबदलेली | फळांनी भरलेली |
| गहिवरून | भावनावश होणे |

No comments:
Post a Comment