''यह एक शैक्षिक ब्लॉग है, यहाँ बालक-पालक-शिक्षक आदि के लिए उपयुक्त जानकारी है. आपसे अनुरोध है कि जहाँ आवश्यकता है वहाँ तक पहुँचाने में सहायता करें।"

स्वागत

'मच्छिंद्र बापू भिसे, शिक्षण सेवक, जिला परिषद् हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर द्वारा हार्दिक स्वागत! संपर्क 9730491952 "

१३. अदलाबदल (7th - Marathi)

 

१३. अदलाबदल

पन्नालाल पटेल (१९१२-१९८९) प्रसिद्ध गुजराथी लेखक. विविध लघुकथा संग्रह, बालसाहित्य, एकांकिका प्रसिद्ध.

अमृत व इसाब या मित्रांमधील अतूट मैत्रीचे वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे.

होळीचा सण होता. सायंकाळची वेळ होती. गावातली काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. एकमेकांवर धूळ उडवत खेळत होती. अमृत व इसाब या दोघांची घट्ट मैत्री होती. ते दोघेही तेथे हातात हात घालून आले व त्यांच्याबरोबर खेळू लागले. आजच शिवून आणलेले नवे कपडे दोघांनी घातले होते. दोघांचे कपडे, रंग, आकार व कापड सर्व दृष्टींनी अगदी सारखे होते. दोघेही एकाच शाळेत, एकाच वर्गात होते. दोघांची घरेही रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर, होती. थोडक्यात म्हणजे, दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट सारखी होती. फरक फक्त इतकाच होता, की अमृतला आईवडील होते, इसाबला फक्त वडील होते.

दोन्ही मुलं आली. खाली रस्त्यावर बसली. दोघांनी एकसारखे कपडे घातलेले पाहून एक मुलगा म्हणाला, "अरे, अमृत, इसाब ! तुम्ही दोघं किती एकसारखे आहात !"

यावरून दुसऱ्या एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली. "अरे तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढत ? म्हणजे तुम्हां दोघांची ताकदही एकसारखीच आहे की एकजण दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे, ते तरी आम्हांला बघायला मिळेल."

पहिल्या मुलाला ही कल्पना आवडली. तो म्हणाला, "खरंच अमृत. तुम्हां दोघांपैकी कोण वरचढ आहे ते बघूया !"

"चला, या पुढे !" आणखी एकजण ओरडला, "ही नुसती गंमत आहे."

इसाबने अमृतकडे पाहिले. अमृत ठामपणे म्हणाला, "नाही, माझी आई मला मारील."

त्याची भीती खरी होती. तो घरातून बाहेर पडत असताना आईने त्याला बजावले होते, "हे बघ. नवीन कपड्यांसाठी तू खूप हट्ट धरला होतास. आता जर का तू ते मळवलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव."

अमृतने अईवडिलांपाशी खूप हट्ट धरला होता, हे खरे होते. इसाबला नवा शर्ट मिळणार असल्याचे कळताच त्यानेही हट्ट धरला होता, की इसाबसारखा शर्ट मिळालाच पाहिजे. आई जर नाही म्हणाली, तर बाबा काही ऐकणार नाहीत, हे अमृत पक्कं ओळखून होता; पण तो सहजासहजी हार मानणारा नव्हता. अखेर नवा शर्ट घेऊन देण्यासाठी आईने अमृतच्या बाबांना गळ घातली. ते छानपैकी नवे कपडे घालून अमृत घरून निघाला होता, त्यामुळे कपडे खराब होतील असे काहीही करायची त्याची तयारी नव्हती. त्यातही इसाबबरोबर कुस्ती लढायची तर त्याची अजिबात इच्छा नव्हती.

त्याचवेळी एकाने अमृतचा हात पकडून म्हटले, "चल रे, कुस्तीचा एक डाव होऊ दे!" त्याने अमृतला मोकळ्या मैदानात खेचून नेले.

त्या मुलाच्या तावडीतून सुटायची अमृतने खूप धडपड केली आणि म्हणाला, "हे बघ केशव, माझी कुस्ती खेळायची मुळीच इच्छा नाही. सोड मला." पण तो त्याला जाऊ देईना. त्याने अमृतला जमिनीवर ढकलले. बाकीची पोरे गमतीने ओरडली, "अमृत हरला, केशव जिंकला ! केशव जिंकला ! हुर्ये, हुर्ये !"

इसाबला हे सहन झाले नाही. त्याचा पारा चढला. त्याने केशवचा हात धरून म्हटले, "चल ये, मी तुझ्याबरोबर कुस्ती लढतो.”

केशव घुटमळला; पण बाकीच्या मुलांनी त्याला चिथावले. दोन्ही मुले परस्परांना भिडली. इसाबने पेच घालून केशवला चीत केले. आता कुठे मुलांच्या लक्षात आले, की गंमत म्हणून सुरू केलेल्या खेळाला भलतेच गंभीर वळण लागले आहे. आता केशवचे आईवडील आपल्याला रागावतील, या भीतीने सर्व मुले सैरावैरा पळून गेली. अमृत व इसाब देखील तेथून निघाले. दोघेही थोड्याच अंतरावर गेले असतील, की अमृतचे लक्ष इसाबच्या शर्टाकडे गेले. त्याचा खिसा फाटला होता. भीतीने दोघांचे पाय जमिनीला खिळले. भीतीने मुलांच्या पोटात गोळा आला. पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची त्यांना कल्पना आली. या शर्टासाठी इसाबच्या वडिलांनी सावकाराकडून पैसे कर्जाऊ घेतले होते. कापड निवडण्यात आणि शर्ट शिवून घेण्यात खूप वेळ खर्ची घातला होता.

अचानक अमृतला एक कल्पना सुचली. त्याने इसाबला एका बाजूला ओढून नेले. स्वतःच्या शर्टची बटणे काढत अमृत म्हणाला, "चल लवकर. काढ तुझा शर्ट. हा माझा शर्ट घाल."

"पण तुझं काय ? तू काय घालणार?" इसाबने विचारले.

"मी तुझा शर्ट घालीन," अमृतने उत्तर दिले. इसाब शर्टाची बटणे काढू लागला. "शर्टाची अदलाबदल ? पण त्याने काय होणार आहे? तुझे बाबा तुला मार देतील."

"खरंय. ते मला मारतील; पण मला वाचवायला आई आहे", अमृत उत्तरला.

इसाब घुटमळला. त्याच वेळी त्याला कुणाच्या तरी खोकण्याचा आवाज जवळून ऐकू आला. दोघा मुलांनी झटपट शर्टाची अदलाबदल केली आणि गल्लीबाहेर आली. मग सावकाश घराकडे चालू लागली.

भीतीने अमृतच्या छातीची धडधड वाढली होती; पण त्याचे नशीब चांगले होते. तो होळीचा दिवस होता. या दिवशी झोंबाझोंबी होणार हे ठरलेलेच असते. अमृतच्या आईने जेव्हा त्याचा फाटलेला शर्ट पाहिला,

तेव्हा तिने फक्त कपाळाला आठ्या घातल्या आणि त्याला माफ करून टाकले. सुईदोरा घेऊन तिने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला.

मुलांची भीती गेली. दोघेही पुन्हा हातात हात घालून बाहेर होळी पेटवली होती ती बघायला निघाले. शर्टाची अदलाबदल केल्याचे एका मुलाच्या लक्षात आले. त्याने या दोघांच्या आनंदावर विरजण घालत टोमणा मारला, "अस्सं! तुम्ही तुमच्या शर्टाची अदलाबदल केली आहे तर!"

आता ही गोष्ट आपल्या वडिलांच्या कानावर जाईल, या धास्तीने दोन्ही मुले आपापल्या घराकडे धावली.

इसाबचे बाबा अंगणात खाटेवर बसले होते. त्यांनी दोन्ही मुलांना हाक मारली, " अरे, असे मित्रांपासून पळताय काय ? या इकडे, बसा माझ्यापाशी."

त्यांनी अमृतला हाक मारली. त्याला बरोबर घेऊन थेट त्याच्या घरी गेले. त्यांनी अमृतच्या आईला हाक मारली. ती घरातून बाहेर आली. हसनभाई म्हणाले, "भाभी, आजपासून तुमचा हा अमृत माझा मुलगा बरं का!"

ती हसत म्हणाली, "काय झालं हसनभाई ! अहो, तुम्हांला एका मुलाकडे बघायला होत नाही, तर या दोघांकडे कसे बघणार?"

"भाभी, अमृतसारखी एकच काय, अनेक मुलं असली, तरी त्या सर्वांना वाढवायची माझी आजपासून तयारी आहे." हसनभाई भावुकपणे, दाटून आलेल्या गळ्याने म्हणाले.

हसनभाईं वहिनींना म्हणाले, "या मुलांना गल्लीत शिरताना मी बघितलं होतं. ती काय करताहेत हे बघण्यासाठी मीही तिथे गेलो."

हसनभाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजारपाजारच्या बायकाही तिथे जमल्या. या मुलांनी आपापल्या शर्टाची अदलाबदल कशी केली हा प्रसंग सांगायला हसनभाईंना फार वेळ लागला नाही. ते सांगून ते पुढे म्हणाले, "इसाबनं अमृतला विचारलं, की तुझ्या बाबांनी तुला मारलं तर ? यावर अमृत काय म्हणाला ठाऊक आहे? तो म्हणाला, 'मला वाचवण्यासाठी माझी आई आहे.' किती खरं आहे ! अमृतच्या उत्तरानं माझ्यात बदल केला आहे. महत्त्व कशाला आहे, हे त्याने मला शिकवलं."

अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले.



“अदलाबदल” पाठ का हिंदी अनुवाद


अदलाबदल 

होली का त्योहार था। शाम का समय था। गाँव के कुछ बच्चे नीम के पेड़ के नीचे इकट्ठा हुए थे। वे एक-दूसरे पर धूल उछालते हुए खेल रहे थे। अमृत और इसाब – ये दोनों पक्के दोस्त थे। दोनों हाथ में हाथ डालकर वहाँ आए और उनके साथ खेलने लगे। आज ही सिलवाकर लाए हुए नए कपड़े दोनों ने पहने थे। दोनों के कपड़े, रंग, आकार और कपड़ा – सब कुछ बिल्कुल एक जैसा था। दोनों एक ही स्कूल में, एक ही कक्षा में पढ़ते थे। दोनों के घर भी सड़क के कोने पर आमने-सामने थे। संक्षेप में, दोनों लड़कों की हर चीज़ एक जैसी थी। बस एक फर्क था – अमृत के माता-पिता थे, जबकि इसाब के केवल पिता थे।

दोनों लड़के आए। नीचे सड़क पर बैठ गए। जब दोनों के कपड़े एक जैसे दिखे, तो एक लड़का बोला, "अरे अमृत, इसाब! तुम दोनों कितने एक जैसे लगते हो!"

यह सुनकर दूसरे शरारती लड़के को एक मज़ेदार ख्याल आया – "अरे, तुम दोनों कुश्ती क्यों नहीं लड़ते? इससे हमें पता चलेगा कि तुम दोनों की ताक़त भी एक जैसी है या कोई एक दूसरे से ज़्यादा ताक़तवर है।"

पहले लड़के को यह बात पसंद आई। वह बोला, "सच में अमृत, चलो देखते हैं तुम दोनों में कौन ज़्यादा ताक़तवर है!"

"चलो आगे!" एक और लड़का चिल्लाया, "यह तो बस मज़ा है।"

इसाब ने अमृत की ओर देखा। अमृत ने दृढ़ता से कहा, "नहीं, मेरी माँ मुझे मारेंगी।"

उसकी यह चिंता सच्ची थी। जब वह घर से बाहर निकला था, तब माँ ने उसे सख्त हिदायत दी थी – "देखो, इन नए कपड़ों के लिए तुमने बहुत ज़िद की थी। अब अगर तुमने इन्हें गंदा या फाड़ दिया तो याद रखना!"

अमृत ने अपने माता-पिता से बहुत ज़िद की थी, यह सच था। जब उसे पता चला कि इसाब को नया शर्ट मिल रहा है, तो उसने भी ज़िद की कि इसाब जैसा ही शर्ट चाहिए। अगर माँ मना करेंगी, तो पापा तो बिल्कुल नहीं सुनेंगे – यह बात अमृत को अच्छे से पता थी। लेकिन वह आसानी से हार मानने वालों में से नहीं था। अंततः माँ ने अमृत के पिताजी से कहकर नया शर्ट दिलवाया। नए कपड़े पहनकर अमृत घर से निकला था, इसलिए कपड़े खराब हो जाएँ – ऐसा कुछ भी करने की उसकी कोई इच्छा नहीं थी। ऊपर से इसाब के साथ कुश्ती लड़ने की तो बिल्कुल भी नहीं।

उसी समय एक लड़के ने अमृत का हाथ पकड़कर कहा, "चलो भाई, एक कुश्ती का खेल हो जाए!" उसने अमृत को मैदान की ओर खींच लिया।

अमृत ने उस लड़के की पकड़ से छूटने की बहुत कोशिश की और कहा, "देखो केशव, मेरी कुश्ती लड़ने की ज़रा भी इच्छा नहीं है। मुझे छोड़ दो।" लेकिन वह उसे नहीं छोड़ रहा था। उसने अमृत को ज़मीन पर ढकेल दिया। बाकी बच्चे मज़े से चिल्लाने लगे – "अमृत हार गया! केशव जीत गया! हुर्रे हुर्रे!"

इसाब से यह देखा नहीं गया। उसे गुस्सा आ गया। उसने केशव का हाथ पकड़कर कहा, "आ जा, अब मैं तेरे साथ कुश्ती लड़ता हूँ।"

केशव झिझका; लेकिन बाकी बच्चों ने उसे उकसाया। दोनों लड़के आपस में भिड़ गए। इसाब ने चालाकी से केशव को चित कर दिया। अब जाकर बच्चों को समझ में आया कि मज़ाक में शुरू किया गया खेल अब एक गंभीर मोड़ पर पहुँच गया है। अब अगर केशव के माता-पिता को पता चला तो वे गुस्सा करेंगे – इस डर से सब बच्चे इधर-उधर भाग गए। अमृत और इसाब भी वहाँ से चले गए। दोनों थोड़ी ही दूर गए होंगे कि अमृत की नज़र इसाब के शर्ट पर पड़ी। उसका पॉकेट फट गया था। डर से दोनों के पाँव जैसे ज़मीन में गढ़ गए। डर के मारे उनके पेट में मरोड़ उठने लगा। अब आगे क्या होगा – इसका अंदाज़ा उन्हें हो गया।

इस शर्ट के लिए इसाब के पिताजी ने साहूकार से उधार पैसे लिए थे। कपड़ा चुनने और सिलवाने में काफी समय और मेहनत लगी थी।

तभी अमृत को एक विचार सूझा। उसने इसाब को एक तरफ खींचकर ले गया। अपने शर्ट की बटन खोलते हुए अमृत बोला – "चलो जल्दी करो, अपना शर्ट उतारो और मेरा शर्ट पहन लो।"

"लेकिन तुम क्या करोगे? तुम क्या पहनोगे?" इसाब ने पूछा।

"मैं तुम्हारा शर्ट पहन लूंगा।" अमृत ने जवाब दिया।

इसाब शर्ट की बटन खोलने लगा। बोला – "शर्ट की अदलाबदल? लेकिन इससे क्या होगा? तुम्हारे पिताजी तुम्हें मारेंगे।"

"सच है, वे मुझे मारेंगे। लेकिन मुझे बचाने के लिए मेरी माँ है।" अमृत ने जवाब दिया।

इसाब कुछ घबराया। तभी उसे किसी के खाँसने की आवाज़ पास से सुनाई दी। दोनों लड़कों ने जल्दी से शर्ट बदला और गली से बाहर निकल आए। फिर धीरे-धीरे अपने घर की ओर बढ़े।

डर के कारण अमृत का दिल ज़ोर-ज़ोर से धड़कने लगा था। लेकिन उसकी किस्मत अच्छी थी। वह होली का दिन था। इस दिन खींचा-तानी होना आम बात है। जब अमृत की माँ ने उसका फटा हुआ शर्ट देखा, तो बस माथे पर शिकन डाली और उसे माफ कर दिया। सुई-धागा लेकर उन्होंने उसका शर्ट सिल दिया।

अब बच्चों का डर खत्म हो गया। दोनों फिर से हाथ में हाथ डालकर बाहर होली जलती देखने निकले। शर्ट की अदलाबदल की बात एक लड़के ने देख ली थी। उसने इन दोनों की खुशी पर पानी फेरते हुए ताना मारा – "अरे! तुम लोगों ने तो शर्ट की अदलाबदल कर ली है, है ना?"

अब यह बात उनके पिताजी के कानों तक जाएगी – इस डर से दोनों लड़के अपने-अपने घर की ओर भागे।

इसाब के पिताजी आँगन में खाट पर बैठे थे। उन्होंने दोनों लड़कों को आवाज़ दी – "अरे, ऐसे क्या भाग रहे हो दोस्तों से? इधर आओ, मेरे पास बैठो।"

उन्होंने अमृत को आवाज़ दी। उसे अपने साथ लेकर सीधे उसके घर गए। उन्होंने अमृत की माँ को आवाज़ दी। वह बाहर आईं।

हसनभाई (इसाब के पिताजी) बोले – "भाभी, आज से आपका यह अमृत मेरा बेटा हुआ!"

वह हँसकर बोलीं – "क्या बात है हसनभाई! अरे आपको एक बेटा सँभाला नहीं जाता, तो इन दोनों को कैसे सँभालेंगे?"

"भाभी, अगर अमृत जैसे एक नहीं, दस बेटे भी हो जाएँ, तो भी मैं आज से उन्हें पालने को तैयार हूँ।" हसनभाई भावुक होकर, भरे गले से बोले।

हसनभाई आगे कहने लगे – "जब ये दोनों लड़के गली में आ रहे थे, मैंने देखा था। ये क्या कर रहे हैं यह देखने के लिए मैं भी वहाँ गया।"

हसनभाई क्या कह रहे हैं – यह सुनने के लिए आस-पड़ोस की औरतें भी वहाँ इकट्ठा हो गईं। इन दोनों बच्चों ने किस तरह से अपने शर्टों की अदलाबदल की – यह प्रसंग बताने में हसनभाई को ज्यादा समय नहीं लगा। यह सब बताकर वे आगे बोले – "इसाब ने अमृत से पूछा – अगर तेरे पापा ने तुझे मारा तो? इस पर अमृत ने क्या जवाब दिया पता है? वह बोला – 'मुझे बचाने के लिए मेरी माँ है।' यह कितनी सच्ची बात है! अमृत के इस जवाब ने मुझे बदल दिया। असली महत्त्व किस बात का है – यह उसने मुझे सिखा दिया।"

अमृत और इसाब के एक-दूसरे के प्रति प्रेम की यह कहानी सुनकर सब लोग भावविभोर हो गए।



पाठ – १३. अदलाबदल  प्रश्नोत्तरे:


१. पाठानुसार उत्तरे द्या :

(१) अमृत व इसाब यांच्यामधील मैत्री कशी होती?
→ अमृत व इसाब यांच्यामधील मैत्री अतिशय घट्ट आणि अतूट होती. ते एकमेकांचे चांगले मित्र होते, शाळा, वर्ग, कपडे, राहणीमान सर्व सारखे होते.

(२) इसाबने कुस्ती लढण्याचा निर्णय का घेतला?
→ अमृतला जबरदस्तीने जमिनीवर ढकलल्यामुळे त्याचे अपमान झाला होता. हे इसाबला सहन झाले नाही, म्हणून त्याने केशवशी कुस्ती करण्याचा निर्णय घेतला.

(३) अमृतने शर्टाची अदलाबदल करण्याचा निर्णय का घेतला?
→ इसाबच्या शर्टाचा खिसा फाटला होता. त्याचे वडील रागावतील या भीतीने इसाब घाबरला होता. त्यावेळी अमृतने आपला फाटलेला शर्ट इसाबला घालायला दिला, कारण त्याच्याकडे आई होती जी त्याचे संरक्षण करील.

(४) अमृतच्या शब्दांनी हसनभाईंच्या मनात काय बदल घडला?
→ अमृत म्हणाला, "माझी आई आहे ना मला वाचवायला." या शब्दांनी हसनभाईंना अंतर्मुख केले आणि त्यांनी अमृतला स्वतःचा मुलगा मानण्याचा निर्णय घेतला.


२. योग्य पर्याय निवडा :

(१) दोघांचे कपडे ________ होते.
(अ) वेगळे (ब) सारखे ✅ (क) फाटलेले (ड) किरकोळ

(२) अमृत आणि इसाब यांची घरे होती –
(अ) जवळजवळ (ब) एकाच गल्लीत (क) समोरासमोर ✅ (ड) दूरदूर

(३) इसाबचे फाटलेले शर्ट पाहून अमृतने काय केले?
(अ) रडू लागला (ब) पळून गेला (क) आपला शर्ट दिला ✅ (ड) आईला सांगितले

(४) अमृतच्या आईने त्याला का माफ केले?
(अ) कारण त्याने खोटं सांगितलं (ब) कारण त्याचा शर्ट शिवता आला ✅
(क) कारण त्याने रडवलं नाही (ड) कारण ती घाबरली होती


३. योग्य जोड्या लावा :

A B
(१) अमृत मन हेलावले
(२) इसाब केशव आणि इसाब
(३) हसनभाई                     आई होती
(४) कुस्ती फाटलेला शर्ट


AB
(१) अमृतआई होती
(२) इसाबफाटलेला शर्ट
(३) हसनभाई                    मन हेलावले
(४) कुस्तीकेशव आणि इसाब

४. खालीलप्रमाणे पूर्ण करा :

(१) अमृत व इसाब एकाच वर्गात होते, एकाचप्रमाणे कपडे घालत, एकाच वयाचे होते.
(२) अमृतची आई होती, पण इसाबचे आई नव्हती.
(३) अमृतला फाटलेल्या शर्टामुळे शिक्षा होईल, तरी त्याने इसाबला आपला शर्ट दिला.
(४) हसनभाईंच्या मनाला मुलांच्या मैत्रीने स्पर्श केला.


५. तुमचे मत लिहा :

(१) अमृतने शर्ट दिला, हे योग्य का? का?
→ हो, योग्य. कारण त्याने आपल्या मित्रासाठी मोठा त्याग केला. त्याला माहीत होते की आई त्याला माफ करेल, पण इसाबला कोणही समजून घेणार नव्हते.

(२) अशा प्रसंगात आपण काय केलं असतं?
→ मीही मित्राला मदत केली असती, कारण खरी मैत्री संकटात ओळखता येते.



संकल्पना, प्रस्तुति, संपादन एवं लेखन

● मच्छिंद्र बापू भिसे 'मंजीत'● ©®
शिक्षण सेवक
जिला परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर, जिला गोंदिया (महाराष्ट्र)
9730491952
सातारा (महाराष्ट्र)

-०-

No comments:

Post a Comment