''यह एक शैक्षिक ब्लॉग है, यहाँ बालक-पालक-शिक्षक आदि के लिए उपयुक्त जानकारी है. आपसे अनुरोध है कि जहाँ आवश्यकता है वहाँ तक पहुँचाने में सहायता करें।"

स्वागत

'मच्छिंद्र बापू भिसे, शिक्षण सेवक, जिला परिषद् हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर द्वारा हार्दिक स्वागत! संपर्क 9730491952 "

७. आजारी पडण्याचा प्रयोग (7th - Marathi)

   

७. आजारी पडण्याचा प्रयोग

द. मा. मिरासदार (जन्म-१९२७) प्रसिद्ध लेखक, कथाकथनकार. 'गप्पागोष्टी', 'गप्पांगण', 'गाणारा मुलूख', 'गुदगुल्या', 'जावईबापूंच्या गोष्टी', 'ताजवा', 'भुताचा जन्म', 'माझ्या बापाची पेंड', 'मिरासदारी' इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध. 'नावेतील तीन प्रवासी' हा अनुवाद, तसेच 'अंगतपंगत', 'बेंडबाजा' हे विनोदी निबंधही प्रसिद्ध.

मुलाचे आजारपणाबाबतचे विचार व त्याचे दवाखान्यातील वागणे याचे मार्मिक व विनोदी वर्णन लेखकाने प्रस्तुत पाठात केले आहे.

आपण एकदाही कधी दुखणेकरी नव्हतो, ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली. छे, छे! निदान एखाद-दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायचे होते ! टायफॉइड, क्षय, न्यूमोनिया असली मोठमोठी, गोड दुखणी राहू दया बाजूला; पण थंडीताप, खोकला, पडसे यांपैकी काहीतरी माझ्या वाटणीला यायला हवे होते. निदान पोटदुखी, डोकेदुखी यांतले तरी काही. आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली अजून असू नये ! एखादेही साधे इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये काय ?

आमच्या घरात नेहमी कुणीतरी आजारी पडायचे. आई नेहमी खोकायची. बाबांना दर आठ दिवसांनी पडसे यायचेच. दादा कॉलेजात जात असला तरी त्याचे अंग नेहमी दुखायचे. कधीकधी ताईचे हात दुखायचे, पाय दुखायचे. तीही गादी टाकून झोपायची. सगळ्यांची औषधे मोठी छान असायची. संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध यांचा मारा सारखा चाललेला असायचा. चार दिवस आजारी पडून अशक्तपणा आला, म्हणजे शिराही रोज व्हायचा. हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही, या गोष्टीचे मला अत्यंत दुःख होऊ लागले. जे पदार्थ ही सगळी मंडळी आजारी म्हणून खात असत, ते 'औषध' या नावाखाली मोडत असत. त्यामुळे त्यांना हात लावायची मला सक्त मनाई असे. ही औषधे आपणही बरोबरीने घ्यावीत आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे मला फार वाटू लागले.

या विचाराने मला काही सुचेना. घरातल्या माणसांचा मला मोठा राग येऊ लागला. त्यांचा स्वार्थीपणा पाहून मी अगदी चिडून गेलो. ती मंडळी स्वतःच इतक्या वेळा आजारी पडत होती, की माझ्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते. ते काही नाही. आपण आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचेच, असे शेवटी मी ठरवून टाकले.

मग नेहमीप्रमाणे मी रोजच्या तीन-चार बाटल्या घेतल्या आणि डॉक्टरांकडे गेलो. चड्डीच्या खिशात मी स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली होती.

दवाखान्यात खूप गर्दी होती. खूप माणसे असली म्हणजे मला फार बरे वाटे, कारण त्यामुळे बराच वेळ दवाखान्यात बसता येते. शिवाय बसलेल्या माणसांच्या चेहऱ्यांकडे बघता येते. काय छान दिसतात एकेक लोक !

हळूच मी खुर्चीवर बसलो आणि लोकांकडे टकामका बघू लागलो. काही लोक कण्हत होते. कुणी इंजेक्शन घेऊन बसले होते. आपल्या दंडावरल्या पिवळ्या डागाकडे मोठ्या फुशारकीने पाहत होते. त्यांच्याकडे पाहून मला त्यांचा फार हेवा वाटू लागला.

हळूहळू पुष्कळ लोक निघून गेले. मग मी हळूच माझी छोटी बाटली डॉक्टरांच्या टेबलावर सरकवली आणि म्हणालो, "डॉक्टर मला बरं वाटत नाही हो, मलाही औषध हवं आहे."

"असं? मग ये इकडे. बघू, तपासू." असे म्हणत डॉक्टरांनी मला खाटेवर झोपायला सांगितले. त्या गुलगुलीत खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली म्हणता ! इतक्या वेळा आपण दवाखान्यात आलो; पण या खाटेवर पडायचे सुख कधीसुद्धा आपल्या वाट्याला आले नव्हते. आता डॉक्टर ती छान नळी आपल्या छातीवर, पोटावर लावतील, तपासतील. कदाचित इंजेक्शनसुद्धा देतील. नाही कुणी म्हणावे ! मग कसले तरी औषध बाटलीत भरून देतील. अहाहा !... आपल्यालाही स्वतंत्र बाटली मिळायची तर एकूण ! दादाची आणि ताईचीच ऐट नको काही एवढी...!

आनंदाने मी खाटेवर लोळत होतो. एवढ्यात डॉक्टर खोलीत आले. त्यांनी मला तपासले. इकडे, तिकडे, पालथे वळायला सांगितले. गळ्यातली नळी छातीवर लावली, जीभ बघितली, तेव्हा तर मला अगदी धन्य धन्य वाटू लागले. त्यांनी जेव्हा पोटावर एकदम टिचकी मारली, तेव्हा तर मला खूप हसायलाच आले. मग मी डॉक्टरांना सांगितले, "डॉक्टर इंजेक्शन दया बरं का. ताईला आणि दादाला खूप झालीत आतापर्यंत. आता मला पाहिजे. निदान एक तरी."

डॉक्टर म्हणाले, "हो का?"

मग क्षणात मनात एक धाडसी विचार चमकून गेला. अगदी खासगी आवाजात मी डॉक्टरांना विचारले, "तुम्हांला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर ?"

डॉक्टर माझ्याकडे एकदम बघायला लागले. थोडे थांबून म्हणाले, "का रे बाबा ?"

"नाही. करायचं असलं तर ते सुद्धा करा. मी काही घाबरत नाही." डॉक्टर पाहतच राहिले. मला वाटले, ते बहुतेक माझ्या सूचनेवर विचार करत असावेत. 'होय' म्हणाले तर फारच चांगले झाले. ऑपरेशन केलेच त्यांनी तर मग काय विचारता ! तसाच पळतपळत घरी जाईन. सगळ्यांना ऑपरेशन दाखवीन.

पण डॉक्टर थंडपणे म्हणाले, "बराय. आता असं कर, तू उतर खाली." मी मोठ्या नाखुशीनेच खाली उतरलो. त्यांच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने बघू लागलो.

"हे बघ, तुला काही झालं नाही. समजलं ना? ठणठणीत आहे तब्येत तुझी, तेव्हा औषध काही नाही. पळ. जा घरी."

डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून माझी फार निराशा झाली. मी रडकुंडीला येऊन म्हणालो, "असं काय हो? दया ना मला एखादं औषध.”



आजारी पडण्याचा प्रयोग” या पाठाचा हिंदी अनुवाद


बीमार पड़ने का प्रयोग
लेखक – द. मा. मिरासदार

जब यह बात ध्यान में आई कि मैं एक बार भी कभी बीमार नहीं पड़ा हूँ, तो मुझे बहुत शर्म महसूस हुई। अरे नहीं! कम से कम एक-दो बार तो मुझे बीमार पड़ना ही चाहिए था! टायफाइड, क्षय (टीबी), न्यूमोनिया जैसे बड़े और "मीठे" (आकर्षक) रोगों की बात छोड़ दीजिए; लेकिन सर्दी-जुकाम, खाँसी या बुखार जैसे छोटे-मोटे रोग तो मुझे मिलने ही चाहिए थे। कम से कम पेट दर्द या सिरदर्द तो होना चाहिए था। आज तक मेरी खुद की एक भी दवाई की बोतल नहीं है! एक भी साधारण इंजेक्शन भी मुझे क्यों नहीं मिला?

हमारे घर में तो हमेशा कोई न कोई बीमार रहता ही था। माँ को हमेशा खाँसी रहती थी। पिताजी को हर आठवें दिन जुकाम होता ही था। भले ही भाई कॉलेज जाता था, पर उसका बदन हमेशा दुखता रहता था। कभी बहन के हाथ दर्द करते थे, कभी पैर। वह भी बिस्तर पर लेट जाया करती थी। सबकी दवाइयाँ बड़ी मजेदार होती थीं – संतरे, मौसंबी, सेब, मिश्री, किशमिश, पेड़े, और मीठी-मीठी दवाइयाँ, इन सबका जैसे हमला ही चल रहा होता था। चार दिन बीमार रहकर जब कमजोरी आती, तब रोज़ मालिश होती थी। यह सब देखकर, मैं बीमार नहीं हूँ, इस बात का मुझे बेहद दुख होने लगा।

जिन चीजों को ये लोग बीमार होने के कारण खाते थे, वे सब "दवा" कहलाती थीं। इसलिए मुझे उन्हें छूने की सख्त मनाही थी। मुझे भी ये दवाइयाँ मिलें और मैं भी उनके दुख में भागीदार बनूं, ऐसा मुझे बहुत लगने लगा।

इन विचारों के कारण मुझे कुछ सूझ नहीं रहा था। घर के लोगों पर मुझे बहुत गुस्सा आने लगा। उनका स्वार्थ देखकर मैं बहुत चिड़ गया। वे लोग खुद ही इतनी बार बीमार पड़ते थे कि मेरे हिस्से में कोई बीमारी आती ही नहीं थी। अब बस! मैंने तय कर लिया कि अब तो मैं बीमार पड़ूँगा ही और डॉक्टर से दवा लाकर ही रहूँगा।

फिर हमेशा की तरह मैं रोज़ की तीन-चार दवाई की बोतलें लेकर डॉक्टर के पास गया। मेरी अपनी खास बोतल मैंने चड्डी की जेब में अलग से संभालकर रखी थी।

डॉक्टर के अस्पताल में बहुत भीड़ थी। जब ज़्यादा लोग हों, तो मुझे बहुत अच्छा लगता था, क्योंकि उस बहाने वहाँ ज़्यादा देर तक बैठने को मिलता। साथ ही, वहाँ बैठे हुए लोगों के चेहरे देखने का मौका भी मिलता। क्या शानदार दिखते थे लोग!

मैं चुपचाप कुर्सी पर जाकर बैठ गया और लोगों की ओर टकटकी लगाकर देखने लगा। कुछ लोग कराह रहे थे, कुछ इंजेक्शन लेकर बैठे थे। वे अपने हाथ पर पीले धब्बे को बड़े गर्व से देख रहे थे। उन्हें देखकर मुझे बहुत जलन हो रही थी।

धीरे-धीरे कई लोग चले गए। तब मैंने चुपचाप अपनी छोटी बोतल डॉक्टर की मेज़ पर सरकाई और कहा, "डॉक्टर साहब, मुझे अच्छा नहीं लग रहा है, मुझे भी दवा चाहिए।"

"अच्छा? तो आओ इधर। देखते हैं, जाँच करते हैं।" ऐसा कहकर डॉक्टर ने मुझे खाट पर लेटने को कहा। उस मुलायम खाट पर लेटना कितना मज़ेदार था, बताऊँ क्या! इतने बार मैं अस्पताल आया था, लेकिन उस खाट पर लेटने का सुख मुझे कभी नहीं मिला था। अब डॉक्टर वह सुनने की नली मेरे सीने, पेट पर लगाएंगे, जाँच करेंगे। शायद इंजेक्शन भी देंगे। कौन जाने! फिर शायद किसी बोतल में दवा भी भरकर देंगे। वाह वाह! मुझे भी अपनी दवा की बोतल मिलनेवाली थी आखिर! भाई और बहन को जितना घमंड था, अब वैसा ही मुझे भी होनेवाला था।

मैं खाट पर मजे से लेटा हुआ था। इतने में डॉक्टर कमरे में आए। उन्होंने मेरी जाँच की। इधर-उधर, पेट के बल करवट करवट से देखा। गले की नली छाती पर लगाई, जीभ देखी – उस समय मुझे बहुत संतोष मिला। जब उन्होंने पेट पर एकदम से थपकी मारी, तो मुझे बहुत हँसी भी आ गई। फिर मैंने डॉक्टर से कहा, "डॉक्टर साहब, मुझे इंजेक्शन दीजिए ना। बहन और भाई को तो बहुत सारे मिल चुके हैं। अब मुझे भी चाहिए, कम से कम एक तो!"

डॉक्टर बोले, "ऐं, अच्छा?"

तभी मेरे मन में एक साहसी विचार चमक उठा। एकदम गुप्त आवाज़ में मैंने डॉक्टर से पूछा, "डॉक्टर साहब, आपको ऑपरेशन करना आता है क्या?"

डॉक्टर मेरी ओर चौंककर देखने लगे। थोड़ी देर बाद बोले, "क्यों भई?"

"नहीं, अगर करना हो तो कीजिए। मुझे डर नहीं लगता।" डॉक्टर मेरी ओर चुपचाप देखते रहे। मुझे लगा, वे शायद मेरे प्रस्ताव पर सोच रहे होंगे। अगर वे 'हाँ' कह दें तो कमाल ही हो जाएगा। ऑपरेशन कर ही दिया तो फिर पूछिए मत! वैसे ही दौड़कर घर जाऊँगा और सबको ऑपरेशन दिखाऊँगा।

लेकिन डॉक्टर शांत स्वर में बोले, "ठीक है। अब ऐसा कर, नीचे उतर जा।" मैं बहुत ही अनमने भाव से नीचे उतरा और डॉक्टर के चेहरे की ओर उत्सुकता से देखने लगा।

"देखो, तुम्हें कुछ भी नहीं हुआ है। समझे? तुम एकदम तंदुरुस्त हो। इसलिए कोई दवा नहीं। भागो। घर जाओ।"

डॉक्टर की यह बात सुनकर मैं बहुत निराश हो गया। मैं तो रोने ही वाला था और कहा,  "ऐसा क्यों डॉक्टर? दया करके मुझे कोई दवा तो दीजिए न!"



‘आजारी पडण्याचा प्रयोग’ पाठावर आधारित प्रश्नोत्तरे


🌟 1. पाठ आशय समजून घेण्यासाठी प्रश्नोत्तरे

प्र.1) लेखकाला आजारी पडण्याची इच्छा का झाली?
उ: लेखक आजारी कधीच पडला नव्हता, त्यामुळे त्याला वाटले की इतर लोकांसारखा अनुभव घेण्यासाठी त्याने कधी ना कधी आजारी पडायला हवे होते. घरातील इतर सदस्य आजारी असताना त्यांना मिळणारी औषधे, फळे, लक्ष यांचा त्याला हेवा वाटत होता.

प्र.2) लेखकाने डॉक्टरांकडे काय केले?
उ: लेखकाने स्वतःची बाटली डॉक्टरांना दिली आणि खोटं सांगितलं की तो आजारी आहे, औषध हवं आहे.

प्र.3) डॉक्टरांनी लेखकाची तपासणी करून शेवटी काय सांगितले?
उ: डॉक्टरांनी सांगितले की तू ठणठणीत आहेस, तुला काही झालेले नाही, त्यामुळे औषध नाही मिळणार.


📚 2. प्रश्नोत्तरे

प्र.1) लेखकाच्या घरात कोण-कोण आजारी पडायचे?
उ: आई खोकायची, बाबांना पडसे यायचे, दादाचे अंग दुखायचे, ताईचे पाय-हात दुखायचे.

प्र.2) लेखकाला कोणती औषधं हव्या होती?
उ: संत्री, सफरचंद, मोसंबी, पेढे, खडीसाखर, बेदाणा, गोड औषधं – ही सगळी औषधे.

प्र.3) लेखकाला दवाखान्यात बसायला का आवडायचे?
उ: कारण तिथे गर्दी असायची आणि वेगवेगळ्या चेहऱ्यांकडे पाहता यायचे.

प्र.4) लेखकाने डॉक्टरांना ऑपरेशनबद्दल काय विचारले?
उ: "तुम्हाला ऑपरेशन करता येतं का?" असे विचारले.


🧠 3. मन:पूर्वक विचार / व्यक्तिचित्रण

प्र.1) लेखकाची मनोवृत्ती या पाठात कशी आहे?
उ: लेखक उत्सुक, लुब्ध आणि थोडा खोडकर आहे. तो इतरांच्या गोष्टी पाहून त्यांची अनुकरण करण्याची इच्छा बाळगतो.

प्र.2) लेखकाचे विचार विनोदी वाटतात का? का?
उ: होय, कारण त्याच्या मनात चालणारे विचार हे अतिशयोक्तीपूर्ण आणि बालसुलभ आहेत, जसे की ऑपरेशन करून घेण्याची इच्छा.


✍️ 4. रिक्त जागा भरा

  1. लेखक दवाखान्यात बाटली घेऊन गेला.
  2. लेखकाच्या डोक्यात ऑपरेशन करण्याचाही विचार आला.

  3. डॉक्टरांनी सांगितले की, तू ठणठणीत आहेस.

  4. घरात नेहमी कुणीतरी आजारी पडत असे.

  5. लेखकाला औषधाची स्वतःची बाटली हवी होती.


🔤 5. योग्य जोड्या लावा

A (वाक्य) B (सामग्री)
आई                         खोकायची
बाबा पडसे यायचे
ताई हात-पाय दुखायचे
लेखक कधीच आजारी पडला नव्हता

📖 6. दीर्घउत्तर प्रश्नोत्तरे

प्र.1) लेखकाने आजारी पडण्याचा प्रयोग का केला, आणि त्याचा शेवट कसा झाला?
उ: लेखकाला वाटायचे की तो कधीच आजारी पडत नाही हे गैर आहे. घरातील इतरांना मिळणारे औषधं, लक्ष, फळं वगैरे पाहून त्याला त्याचा हेवा वाटत होता. म्हणून तो स्वतः आजारी असल्याचे नाटक करून डॉक्टरांकडे गेला. शेवटी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की त्याला काहीही झालेले नाही आणि औषध दिले नाही. त्यामुळे त्याला निराशा झाली.


📖 7. बरोबर की चूक – लिहा

  1. लेखक खूप वेळा आजारी पडला होता. (❌)

  2. लेखकाला संत्री, मोसंबी खाण्याची इच्छा होती. (✅)

  3. डॉक्टरांनी लगेच लेखकाला इंजेक्शन दिले. (❌)

  4. लेखकाने ऑपरेशनचा प्रस्ताव डॉक्टरांना दिला. (✅)

  5. डॉक्टर म्हणाले की, तुला काही झाले नाही. (✅)



संकल्पना, प्रस्तुति, संपादन एवं लेखन

● मच्छिंद्र बापू भिसे 'मंजीत'● ©®
शिक्षण सेवक
जिला परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर, जिला गोंदिया (महाराष्ट्र)
9730491952
सातारा (महाराष्ट्र)

-०-

No comments:

Post a Comment