''यह एक शैक्षिक ब्लॉग है, यहाँ बालक-पालक-शिक्षक आदि के लिए उपयुक्त जानकारी है. आपसे अनुरोध है कि जहाँ आवश्यकता है वहाँ तक पहुँचाने में सहायता करें।"

स्वागत

'मच्छिंद्र बापू भिसे, शिक्षण सेवक, जिला परिषद् हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर द्वारा हार्दिक स्वागत! संपर्क 9730491952 "

२. श्यामचे बंधुप्रेम (7th - Marathi)

 

२. श्यामचे बंधुप्रेम

सानेगुरुजी- पांडुरंग सदाशिव साने (१८९९-१९५०) सानेगुरुजींनी कथा, कविता, कादंबऱ्या असे विपुल ललित लेखन, तसेच वैचारिक लेखन केलेले आहे. 'श्यामची आई', 'धडपडणारी मुले', 'भारतीय संस्कृती', 'गोड गोष्टी', 'सुंदर पत्रे' इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. 'श्यामची आई' या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे.

श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडाविषयी असलेला जिव्हाळा व प्रेम, तसेच आईने मुलांना दिलेली शिकवण याचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे.

मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो, तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. 'गंधवती पृथ्वी' या वचनाची त्या वेळेस आठवण येते. फुलाफळांत जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्याच पोटातला.

घरून दापोलीस येताना या वेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्या वेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, "तुझे अण्णा-दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू.

" मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते. आम्हांला कोट माहीतच नव्हता. कित्येकदा सदराही वर्षा-दोन वर्षांनी नवीन मिळावयाचा. थंडीच्या दिवसांत धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे. मफलर नव्हते, जाकिटे नव्हती, गरम कोट नव्हते.

माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला दोन-तीन गाबड्या लावल्या होत्या. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा, असे मी ठरवून आलो होतो; परंतु पैसे कोठून आणावयाचे?

माझे वडील कोर्ट-कचेरीच्या कामास दापोलीस येत. वडील दापोलीस आले म्हणजे आणा-दोन आणे मला खाऊला म्हणून देऊन जायचे. खाऊच्या पैशांतील एक पैसाही खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेश चतुर्थीला तीन महिने होते. तेवढ्या महिन्यांत या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता. गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा, असे मी मनात निश्चित केले.

ध्येयावर डोळे होते. रोज पैसे मोजत होतो. गणेश चतुर्थी जवळ येत चालली. मजजवळ एक रुपया दोन आणे जमले होते. गौरी-गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील; परंतु माझ्या भावास कोण शिवील? माझ्या भावाला मी शिवून देईन.

मी शिंप्याकडे गेलो. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले. दोन वार कापड घेतले. अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. जवळच्या पैशांत सारा खर्च भागला. तो कोट हातात घेतला, तेव्हा माझे डोळे अश्रूनी न्हाले होते.

मी घरी जाण्यास निघालो. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले, "पावसापाण्याचा जाऊ नकोस. नदीनाल्यांना पूर आले असतील. पिसईचा पन्ह्या, सोंडेघरचा पह्या यांना उतार नसेल, आमचे ऐक".

मी कोणाचे ऐकले नाही. हृदयात प्रेमपूर आला होता, तो नदीनाल्यास थोडीच भीक घालणार !

नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. सुखस्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल, या कल्पनेत मी होतो. एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. तिचा हिरवा रंग असतो. नानेटी उड्या मारत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. पिसईचा पह्या दुथडी भरून वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे काठी टाकावयाची व मग पाऊल टाकावयाचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो; परंतु कसाबसा बाहेर आलो. इतर नदीनाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला! तो मला कसा बुडवील? मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. त्या नाल्याइतकाच उत्सुक होतो, धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो.

रस्त्यातील खडी वर आली होती. सुयांसारखे दगड पायांना खुपत होते; परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती; परंतु वाटेतच अंधार पडला. कडाड् कडाड् आवाज गरजत होते. विजा चमचम करत होत्या. खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो.

शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओलाचिंब होऊन गेलो होतो. 'आई!' मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते.

'अण्णा आला, आई, अण्णा,' धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले.

"इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना?" आई विचारू लागली.

"सोंडेघरच्या पन्ह्याला पाणी नव्हते का रे?" वडिलांनी विचारले.

"हो. परंतु मी आलो कसातरी!" मी म्हटले.

"त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून." वडील म्हणाले.

"बरे, ते कपडे काढ. कढत पाण्याने अंघोळ कर." आई म्हणाली.

मी अंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटत असते, की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल; परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार? कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार? मी गरीब होतो; परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला. नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते! ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती.

"अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा? हा नवीन कोट कोणाला रे?" धाकटा भाऊ कोट घेऊन मजजवळ येऊन विचारू लागला.

"मग सांगेन. घरात जा घेऊन." मी म्हटले.

"आई, हा बघ कोट. हा काही अण्णाच्या अंगाचा नाही. हा मला आणलाय. होय आई?" धाकटा भाऊ आईला विचारू लागला.

आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो.

आई म्हणाली, "श्याम, हा कोणाचा कोट?"

"मोरू जोश्यांकडे का रे दयावयाचा आहे? कापातल्या मुक्याने पाठविला असेल!" वडील म्हणाले.

"नाही. हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे." मी म्हटले.

"पैसे रे कोठले? कोणाचे कर्ज काढलेस? का फीचे दवडलेस ?" वडिलांनी विचारले.

"कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास?" आईने कातर स्वरात विचारले.

"आई, मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाहीत, फीचेही खर्चिले नाहीत." मी म्हटले.

"मग उधार का शिवून आणलास, श्याम?" वडिलांनी विचारले.

"भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा, दोन आणे देत असा, ते मी जमविले. गेल्या दोन-तीन महिन्यांचे सारे जमविले. त्यातून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, 'तुझे अण्णा, दादा मोठे होतील, मग पुरुषोत्तमला नवीन शिवतील कोट.' मी मनात ठरविले होते, की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणावयाचा. पुरुषोत्तम, बघ तुला होतो का?" मी म्हटले.

"अण्णा, हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा ! आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई, बघ!" पुरुषोत्तम आईला दाखवू लागला.

मी सांगितलेली हकिकत ऐकून आईला गहिवर आला. ती म्हणाली, "श्याम, तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस; परंतु मनाने मोठा आजच झालास हो! हेच प्रेम बाळांनो, पुढेही ठेवा. या प्रेमावर कोणाची दृष्टी नको पडायला." वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला. ते बोलले नाहीत. त्या हात फिरविण्यात सारे बोलणे होते. साऱ्या स्मृती होत्या.





"श्यामचे बंधुप्रेम" या मराठी पाठाचा हिंदी अनुवाद 


श्याम का भाई के प्रति प्रेम

परिचय:  साने गुरुजी – पांडुरंग सदाशिव साने: साने गुरुजी (1899–1950) ने कहानियाँ, कविताएँ, उपन्यास और वैचारिक लेखन भरपूर मात्रा में किया है। ‘श्यामची आई’, ‘धडपडणारी मुले’, ‘भारतीय संस्कृती’, ‘गोड गोष्टी’, ‘सुंदर पत्रे’ आदि उनकी प्रसिद्ध पुस्तकें हैं। यह पाठ उनकी प्रसिद्ध कृति ‘श्यामची आई’ से लिया गया है।

इस पाठ में श्याम के मन में अपने छोटे भाई-बहनों के प्रति जो स्नेह और प्रेम है, और जो शिक्षा उनकी माँ ने उन्हें दी थी, उसका हृदयस्पर्शी वर्णन किया गया है।


हिंदी अनुवाद:

गर्मी की छुट्टियाँ समाप्त हो गईं और मैं फिर से दापोली पढ़ाई के लिए गया। पाठशाला शुरू हुई। बारिश का मौसम भी आ गया। तप्त (गर्म) ज़मीन पर बादल पानी बरसाने लगे। जब गर्म ज़मीन पर पानी गिरता है, तो कैसी सुंदर खुशबू फैल जाती थी। जब नई बारिश शुरू होती है, तब मिट्टी से एक सुंदर, मनभावन सुगंध निकलती है। उस समय "गंधवती पृथ्वी" (सुगंधमयी धरती) यह वचन याद आता है। फूलों और फलों में जो रस और गंध होता है, वह स्वाद धरती के गर्भ से ही आता है।

घर से दापोली लौटते समय इस बार मैं एक निश्चय करके आया था। छुट्टियों में एक दिन मेरा छोटा भाई नए कुर्ते के लिए ज़िद कर रहा था। तब माँ ने उसे समझाते हुए कहा था, "तेरे अण्णा (बड़े भाई) और दादा बड़े होंगे, कमाई करेंगे, तब तुझे हर छह महीने में नया कुर्ता सिला कर देंगे। अब ज़िद मत कर।"

मित्रों, मेरे बचपन में कपड़ों की भरमार नहीं थी। हमें कोट का मतलब भी नहीं पता था। कई बार कुर्ता साल-दो साल में ही नया मिलता। सर्दी के दिनों में धोती को चौखाने में बाँधकर गले में पहनकर पाठशाला जाना पड़ता। मफलर नहीं थे, जैकेट नहीं थे, गर्म कोट भी नहीं थे।

मेरे छोटे भाई का कुर्ता फट गया था। माँ ने उसमें दो-तीन जगह पैबंद लगाए थे। तब मैंने ठान लिया कि मैं अपने भाई के लिए नया कुर्ता सिलवाकर ले जाऊँगा। लेकिन पैसे कहाँ से लाऊँ?

मेरे पिता जी अदालत के काम से दापोली आया करते थे। जब वे आते, तो दो आने मुझे खाने के लिए दे जाते। मैंने ठान लिया था कि खाने के लिए दिए गए पैसों में से एक पैसा भी खाने में खर्च नहीं करूँगा। हमारी स्कूल ज्येष्ठ (मई-जून) में शुरू हो जाती थी। गणेश चतुर्थी तक तीन महीने का समय था। इस दौरान मैं एक रुपया इकट्ठा कर सकता था। और गणेश चतुर्थी पर मैं अपने छोटे भाई के लिए कुर्ता सिलवाकर ले जाऊँगा — यह मैंने निश्चित कर लिया।

मेरी नजर हमेशा अपने उद्देश्य पर थी। मैं रोज पैसे गिनता। गणेश चतुर्थी नज़दीक आ रही थी। मेरे पास एक रुपया दो आने इकट्ठा हो चुके थे। गौरी-गणपति के अवसर पर गाँव के सभी बच्चों के लिए उनके माता-पिता नए कपड़े सिलवाते। लेकिन मेरे भाई के लिए कौन सिलेगा? — मैं सिला कर दूँगा!

मैं दर्जी के पास गया। अपने भाई की उम्र का एक लड़का साथ ले गया। उसके नाप पर कुर्ता सिलने को कहा। दो गज कपड़ा और आधा गज अस्तर लिया। कुर्ता तैयार हो गया। सारा खर्च उसी जमा पैसों से हो गया। जब मैंने वह कुर्ता हाथ में लिया, तो मेरी आँखें भर आईं।

मैं घर की ओर निकल पड़ा। जिनके यहाँ मैं रहता था, उन्होंने कहा, "इतनी बारिश में मत जाओ। नदियों और नालों में पानी भरा होगा। पिसई का नाला, सोंडेघर का बहाव – वहाँ पानी बहुत तेज़ रहता है। हमारी बात मानो।"

मैंने किसी की बात नहीं मानी। मेरे हृदय में प्रेम की बाढ़ आई थी। क्या नाले-नदियाँ उसे रोक सकती थीं?

नया कुर्ता बाँधकर मैं निकल पड़ा। काश! मुझे पंख होते तो उड़कर पहुँच जाता। चलने की थकान महसूस ही नहीं हो रही थी। मैं तो खुशी के सपनों में खोया था। सोच रहा था, माँ को कितनी खुशी होगी। इसी कल्पना में खोया था। तभी एक "नानेटी" (हरे रंग का एक साँप) मेरे पैरों के पास से उछलता हुआ निकल गया। मुझे थोड़ा डर लगा। धीरे-धीरे चलने लगा।

पिसई का नाला उफान पर था। उसका पानी बहुत तेज़ था। अब क्या करूँ? मैंने माँ का नाम लिया और पानी में उतर गया। हाथ में एक लकड़ी थी। पहले उसे आगे डालता और फिर पैर बढ़ाता। मैं बह ही जाता, पर किसी तरह बाहर आ गया। बाकी नालों को मिलने जा रहा था प्रेम में भरा नाला! वो मुझे कैसे डुबो सकता था? मैं अपने भाई से मिलने जा रहा था। जितनी व्याकुलता उस नाले में थी, उतनी ही मेरे मन में भी थी।

रास्ते में खड़ी (पत्थर) ऊपर आ गई थीं। पत्थर सुइयों जैसे पैरों में चुभ रहे थे, लेकिन मुझे उसका ध्यान भी नहीं था। अँधेरा होने से पहले घर पहुँचना था, इसलिए जल्दी चल रहा था। पर रास्ते में ही अँधेरा हो गया। आकाश गरज रहा था। बिजली चमक रही थी। पानी तेज़ी से बह रहा था। उन पंच महाभूतों (प्रकृति की शक्तियों) के बीच मैं चल रहा था।

आखिरकार मैं घर पहुँच गया। पूरी तरह भीग गया था। बाहर से ही मैंने आवाज़ दी, "आई!" (माँ)। मौसम बहुत ठंडा हो गया था। पिता जी संध्या वंदना कर रहे थे और माँ ने चूल्हे में अंगारे सेंकने को रखे थे।

"अण्णा आया, आई, अण्णा!" – छोटा भाई दौड़कर दरवाज़ा खोलने आया। दोनों छोटे भाई मिले।

"इतनी बारिश में श्याम क्यों आया रे? तू पूरा भीग गया है!" माँ ने पूछा।

"सोंडेघर वाले नाले में पानी नहीं था क्या?" पिता जी ने पूछा।

"था, पर किसी तरह आ गया!" मैंने कहा।

"उस दिन एक औरत बह गई थी उसमें!" – पिता जी बोले।

"अच्छा, अब कपड़े उतारो, गरम पानी से नहा लो।" – माँ ने कहा।

मैं नहाने चला गया। मेरा छोटा भाई मेरे छोटे से गाठोड़े (पोटली) को खोलने लगा। बच्चों की आदत ही होती है — उन्हें लगता है कि इसमें उनके लिए कुछ ज़रूर होगा। लेकिन मैं उन्हें क्या ला सकता था? कौन-सी मिठाई, कौन-सा खिलौना, कौन-सी रंगीन किताब? मैं तो गरीब था। लेकिन फिर भी, उस गाठोड़े में भाई को कुछ मिला। एक नया कोट। वह कोट नहीं था, वह मेरा दिल था, मेरा प्रेम था! वह माँ की सिखाई हुई शिक्षा का फल था!

"अण्णा, ये छोटा कोट किसका है? ये नया कोट किसके लिए?" – छोटा भाई कोट लेकर मुझसे पूछने लगा।

"बाद में बताऊँगा। अंदर ले जाकर रखो।" – मैंने कहा।

"आई, देखो ये कोट! ये अण्णा का नहीं है। ये मेरे लिए लाया है, है ना माँ?" – वह माँ से पूछने लगा।

माँ ने सूखा धोती दी। मैं चूल्हे के पास गर्म होने बैठा।

माँ ने पूछा, "श्याम, ये कोट किसका है?"

"मोरू जोशी के लिए है क्या? शायद उनके मामा ने भेजा होगा!" – पिता जी बोले।

"नहीं, ये मैंने पुरुषोत्तम (छोटे भाई) के लिए सिलवाया है।" – मैंने कहा।

"पैसे कहाँ से लाए? किसी से कर्ज़ तो नहीं लिया? या स्कूल की फीस खर्च कर दी?" – पिता जी ने पूछा।

"तू किसी के पैसे तो नहीं चुराए ना?" – माँ ने चिंता से पूछा।

"आई, मैंने ना कर्ज़ लिया, ना चोरी की, ना फीस खर्च की।" – मैंने कहा।

"तो फिर उधारी पर सिलवाया क्या श्याम?" – पिता जी ने पूछा।

"भाऊ, जब आप मुझे खाने के लिए दो आने देते थे, तब मैंने वो पैसे जमा किए। पिछले दो-तीन महीनों में सब इकट्ठा किया। उसी से ये कोट सिलवाया। माँ कहा करती थी, 'तेरे अण्णा-दादा बड़े होंगे, तब पुरुषोत्तम को नया कुर्ता देंगे।' तब मैंने मन में ठान लिया था कि जब छुट्टियों से लौटूँगा, तो उसे नया कुर्ता लाऊँगा। पुरुषोत्तम, देखो ये तुझे ठीक आता है क्या?" – मैंने कहा।

"अण्णा, ये देखो कितना अच्छा फिट होता है, और अंदर जेब भी है! अब मेरी पेंसिल नहीं गिरेगी। आई, देखो ना!" – पुरुषोत्तम माँ को दिखाने लगा।

मेरी बात सुनकर माँ भावुक हो गई। वह बोली, "श्याम, तू उम्र से बड़ा नहीं है, पैसों से बड़ा नहीं है, पढ़ाई से बड़ा नहीं है; पर तू मन से आज बहुत बड़ा बन गया रे! बच्चों, यही प्रेम हमेशा बनाए रखना। इस प्रेम पर किसी की बुरी नजर न लगे!"

पिता जी ने भी मेरे पीठ पर हाथ फेरा। उन्होंने कुछ नहीं कहा। उस स्पर्श में ही सब कुछ था — सारे भाव, सारी यादें।



"श्यामचे बंधुप्रेम" या पाठावर आधारित प्रश्नोत्तर


✳️ १. लघुत्तर प्रश्न-

  1. श्याम दापोलीला का गेला होता?
    ➤ तो शाळेसाठी दापोलीला गेला होता.

  2. पावसात मातीच्या गंधाबद्दल श्याम काय म्हणतो?
    ➤ त्याला तो गंध अतिशय गोड वाटतो आणि "गंधवती पृथ्वी" हे वचन आठवते.

  3. श्यामच्या मनात काय निश्चय होता?
    ➤ आपल्या लहान भावासाठी गणपतीच्या सणाला नवीन कुर्ता घेऊन जायचा.

  4. पैसे मिळवण्यासाठी श्यामने काय केलं?
    ➤ त्याने वडिलांकडून मिळालेल्या खाऊच्या पैशांतून पैसे साठवले.

  5. कुर्ता शिवून घेताना श्यामने नापासाठी काय केलं?
    ➤ एका त्याच्याच वयाच्या मुलाला सोबत नेलं आणि त्याच्या मापावर कुर्ता शिवून घेतला.

  6. घरचे लोक श्यामला पावसात जायला का म्हणाले?
    ➤ नाले व नद्या भरले होते, म्हणून ते त्याला थांबायला सांगत होते.

  7. श्यामने आईला कुर्त्याबाबत काय सांगितलं?
    ➤ हा कुर्ता त्याने आपल्या लहान भावासाठी शिवून घेतला आहे, असे सांगितले.


✳️ २. दीर्घ उत्तर प्रश्न -

  1. श्यामने आपल्या भावासाठी प्रेमाचे कोणते उदाहरण घालून दिले?
    ➤ श्यामने आपल्या लहान भावासाठी नवीन कुर्ता देण्यासाठी स्वतः उपाशी राहून, वडिलांकडून मिळालेल्या खाऊच्या पैशांतून पैसे साठवले. त्याने आपल्या भावाच्या वयाच्या मुलाचे माप घेऊन कुर्ता शिवून घेतला. मोठ्या पावसात, रस्त्यांवरून, नाल्यांतून चालत तो तो कुर्ता घेऊन घरी पोहोचला. ही त्याच्या प्रेमाची, त्यागाची आणि चिकाटीची प्रेरणादायक गोष्ट आहे.

  2. पाठामधून आपल्याला काय शिकायला मिळते?
    ➤ प्रेम, त्याग, कुटुंबातील नात्यांचे मोल, आणि आई-वडिलांची शिकवण किती महत्त्वाची असते हे शिकायला मिळते. श्यामची समजूतदारपणा, त्याची भावनशीलता आणि कुटुंबासाठी काहीही करण्याची तयारी — हे सर्व गुण प्रेरणा देतात.


✳️ ३. योग्य / अयोग्य लिहा.

विधान योग्य/अयोग्य
श्याम पावसात घरी गेला. योग्य
श्यामने पैसे वडिलांकडून मागितले. अयोग्य
श्यामने भावासाठी नवीन टोपी घेतली.                 अयोग्य
आईने श्यामला प्रेमाने कुशीत घेतलं. योग्य

✳️ ४. रिकाम्या जागा भरा.

  1. श्याम दापोलीला ____________ साठी गेला होता.
    ➤ शाळा

  2. श्यामने खाऊचे पैसे ________________ केले.
    ➤ साठवले

  3. कुर्त्याच्या गाठीला श्यामने ___________ म्हणवलं.
    ➤ आपलं हृदय

  4. आई म्हणाली, “श्याम तू मनाने ________________ झाला आहेस.”
    ➤ मोठा


✳️ ५. बरोबर जोड्या लावा.

स्तंभ A स्तंभ B
श्याम शिकवण देणारी
पुरुषोत्तम                         संध्याकाळी संध्या करत
आई मोठा भाऊ
नाना लहान भाऊ

उत्तर
स्तंभ Aस्तंभ B
श्याममोठा भाऊ
पुरुषोत्तम                        लहान भाऊ
आईशिकवण देणारी
नानासंध्याकाळी संध्या करत


✳️ ६. अर्थ स्पष्ट करा.

“श्याम, तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, पण तू मनाने मोठा झालास.”
स्पष्टीकरण:
ही ओळ आईने श्यामला त्याच्या प्रेमळ आणि त्यागमय वागणुकीनंतर सांगितली. वय, पैसा यापेक्षा माणसाचा ‘मन’ मोठं असणं खूप महत्त्वाचं असतं. श्यामने आपले स्वतःचे सुख बाजूला ठेवून भावासाठी जे केलं, त्यातून त्याच्या मोठेपणाचं दर्शन घडलं.


✳️ ७. स्वतःचे उत्तर लिहा. 

  1. तुला श्यामचा गुण कोणता आवडला आणि का?

  2. तू श्यामच्या जागी असतास, तर काय केलं असतंस?

  3. कधी तू आपल्या भावंडांसाठी काही त्याग केला आहेस का?



संकल्पना, प्रस्तुति, संपादन एवं लेखन

● मच्छिंद्र बापू भिसे 'मंजीत'● ©®
शिक्षण सेवक
जिला परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर, जिला गोंदिया (महाराष्ट्र)
9730491952
सातारा (महाराष्ट्र)

-०-

No comments:

Post a Comment