
११. मिनूचा जलप्रवास
एक होती नदी. तिच्यात होते खूप खूप पाणी. निळे निळे, थंडगार व स्वच्छ ! इतके स्वच्छ की वरून पाहिले, की तळाची वाळू दिसायची. गोल गोल गोटे दिसायचे अन् सुळसुळ् पोहणारे छोटे मासेही दिसायचे. माशांच्या समूहात राहायची मिनू मासळी! मिनू होती इवलीशी. अगदी तुमच्या हाताच्या छोट्या बोटाएवढी. रुपेरी कल्ल्यांची! इतर मासे तिचे खूप खूप लाड करायचे. तिला क्षणभरही नजरेआड होऊ दयायचे नाहीत; पण मिनूला नदीच्या त्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता.
ती आईला विचारायची, "आई, एवढं पाणी रोज कुठं जातं?" आई म्हणायची, "मिनू, पुढे मोठा समुद्र आहे त्यात जातं ! "आई, समुद्र केवढा असतो?" मिनू विचारी. "मला माहीत नाही बाळ." आई म्हणायची.
मिनू मधूनमधून विचार करायची, खरेच केवढा असेल बरे समुद्र ? रोज एवढे पाणी त्यात जमते म्हणजे खूपच मोठा असणार आणि खूप खूप खोलही! असे केले तर ! तो समुद्रच बघून आलो तर ! आनंदाने तिने टुणकन उडीच मारली.
एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहायला लागले. नदीचे पाणी गढुळले. मासे बावरून एकमेकांना शोधू लागले; पण कोणीच कोणाला दिसेना. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळात मिनूची व आईची चुकामूक झाली व पाण्याबरोबर मिनूही गिरक्या घेत निघाली. खूप वेळ ती अशीच पोहत होती. मिनूने हळूच तोंड उघडले. थू थू! सगळे खारट पाणी! अय्या ! म्हणजे समुद्र, समुद्र म्हणतात तो आला की! बापरे, केवढा लांबपर्यंत पसरलेला आहे. नजरसुद्धा पोहोचत नाही इतक्या लांब ! चला, थोडीशी चक्कर मारून परत जावे झाले ! मिनू हळूहळू पुढे निघाली. पाण्यात एका बाजूला लांबपर्यंत खडकांच्या रांगा होत्या. त्यांतील एका खडकावर फुलेच फुले होती. नदीच्या पाण्यावर तरंगायची तशी ! मिनूला गंमत वाटली. ती हळूहळू पुढे निघाली. लाल, गुलाबी, अंजिरी फुले. किती छान छान रंग होते त्यांचे !
इतक्यात तिची एका विचित्र माशाशी टक्कर झाली. त्याचे तोंड घोड्यासारखे होते व पोटाला पिशवी होती. त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती. मिनूला क्षणभर हसूच आले.
"कोण तुम्ही?" तिने विचारले; पण तो पिवळा मासा काहीच न बोलता हळूहळू पुढे गेला.
एवढ्यात तळाकडून आवाज आला. "त्याचं नाव घोडमासा, समुद्रघोडा !" आवाजाच्या रोखाने मिनूने पाहिले. तळाशी एक मोठे कासव बसले होते. नदीत असते त्यापेक्षा कितीतरी मोठे! मिनू लाटांच्या पायऱ्या उतरत त्याच्याजवळ पोहोचली व म्हणाली,
"कासवदादा, तुम्ही इकडं कधी आलात?"
"मी तर इथंच राहतो" ते म्हणाले.
"नाहीच मुळी. आमच्या नदीतही एक छान छान कासवदादा आहेत."
" ते वेगळे. मी समुद्रात राहतो! पण तू इकडं का आलीस? इथं तर पावला पावलांवर संकटं उभी आहेत. बघितलंस किती चित्रविचित्र मासे फिरतायत इकडून तिकडे ! तो आठ हात असलेला अष्टभुज मासा. तो कसा उलटा चालतोय, बघितलंस का? पाण्याच्या चुळा भरत हळूहळू मागं सरकतो. आपल्या आठ हातांनी मासे, खेकडे पकडून खातो. पाण्यात उतरणारी माणसंसुद्धा त्याला घाबरतात बरं का!"
"पण कासवदादा, इथं तर तळाला नदीसारखेच शंख-शिंपले पडलेले आहेत!"
"पण नदीतल्या शंख-शिंपल्यांत काय असते? इथं या दोन शिंपल्यांच्या पेटीत एक किडा बसलेला असतो बरं का! त्याला चालायचं असलं, की आपले
पाय फटीतून बाहेर काढून तो हळूहळू चालतो. हा अगदी मांसाचा गोळा असतो गोळा. या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला, की तो याच्या अंगाला टोचायला लागतो. मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. तरी बोचणं काही संपतच नाही. हा आपला तसाच गुंडाळत राहतो. मग त्यातून छानदार मोती तयार होतो. इथं तळापर्यंत कधी कधी माणसं येतात. शिंपले उचलून घेऊन जातात."
इतक्यात त्यांच्यामधून एक प्राणी तिरका तिरका चालत गेला. तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी मिनूकडे पाहत होता. आता मात्र मिनूची घाबरगुंडी उडाली. पळत जाऊन ती कासवदादाजवळ उभी राहिली.
"घाबरू नकोस, हा तर खेकडा! याच्या पाठीवर माझ्यासारखंच कठीण कवच आहे. त्यामुळे शत्रू याच्यावर हल्ला करू शकत नाही. याला सहा तर कधी आठ पायही असतात. तरीपण बेट्याला सरळ मात्र चालता येत नाही. तोंडाजवळ दोन नांग्या असतात त्यामुळे त्याचं संरक्षणही होतं व त्याला भक्ष्यही पकडता येतं.
"आता तू माझ्याबरोबर चल, आपण खूप दूर व खूप खूप खोल जाऊ. तिथे खूप अंधार असेल, कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही. तिथं प्रचंड आकाराचे मासे पोहतात. काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. चल येतेस गंमत बघायला?"
"नको रे बाबा." घाबरून मिनू म्हणाली, "मला माझ्या आईकडे जायचंय."
कासवदादा हसून तिच्याबरोबर निघाले. वाटेत ठिकठिकाणी जाळी सोडलेली होती. ती चुकवत त्यांनी मिनूला नदीत आणून सोडले !
अहाहा! नदीच्या गोड पाण्याचा स्पर्श मिनूच्या अंगाला झाला. तिने दोन-तीन चुळा भरल्या. खारट तोंड स्वच्छ धुतले गेले.
"कासवदादा, चला ना माझ्याबरोबर." तिने आग्रह केला.
"नको मिनू. जसा तुला समुद्र आवडत नाही, तशीच मला नदी आवडत नाही. बरं! येतो मी, तू मात्र आता घरीच जा हं!" वळून बघत कासवदादा हळूहळू निघाले.
मिनूला क्षणभर वाईट वाटले. कासवदादांनी तिला कितीतरी गमती दाखवल्या होत्या. त्या कधी एकदा आईला सांगेन, असे तिला झाले होते.
- विनया साठे
११. मिनू का जल-प्रवास
एक नदी थी। उसमें बहुत सारा पानी था — नीला नीला, ठंडा और साफ़! इतना साफ़ कि ऊपर से देखने पर नीचे की रेत भी दिखाई देती थी। गोल-गोल कंकड़ दिखाई देते थे और फुर्ती से तैरने वाली छोटी-छोटी मछलियाँ भी दिखाई देती थीं। मछलियों के झुंड में मिनू मछली रहती थी। मिनू बहुत छोटी थी — बिल्कुल तुम्हारी छोटी उंगली जितनी। उसकी चांदी जैसी चमकती पर थीं। दूसरी मछलियाँ उसे बहुत प्यार करती थीं। वे उसे एक पल के लिए भी आँखों से ओझल नहीं होने देती थीं।
लेकिन मिनू को नदी के उस गहरे हिस्से में रहना अच्छा नहीं लग रहा था।
मिनू कभी-कभी सोचती, सच में समुद्र कितना बड़ा होगा? रोज़ इतना पानी उसमें जमा होता है, तो ज़रूर बहुत ही बड़ा और बहुत गहरा होगा। अगर ऐसा है तो — क्यों न चलकर खुद ही समुद्र देख आएं! और वह खुशी-खुशी कूद पड़ी।
एक दिन भारी बारिश होने लगी। ज़मीन से पानी की धाराएँ बहने लगीं। नदी का पानी गंदा हो गया। मछलियाँ घबरा गईं और एक-दूसरे को ढूंढने लगीं, लेकिन कोई किसी को दिख नहीं रहा था। पानी तेजी से बह रहा था। इस अफरा-तफरी में मिनू और उसकी माँ बिछड़ गईं और मिनू भी पानी के साथ-साथ घूमती हुई बह चली। वह काफी देर तक ऐसे ही तैरती रही।
मिनू ने धीरे से मुँह खोला — थू थू! सब खारा (नमकीन) पानी! अरे! मतलब, यही तो समुद्र है जिसके बारे में सब कहते हैं! ओह! कितना दूर तक फैला है — नज़र भी नहीं पहुँचती इतनी दूर! चलो, थोड़ी सैर करके वापस लौटते हैं! मिनू धीरे-धीरे आगे बढ़ने लगी।
पानी में एक तरफ़ दूर तक चट्टानों की कतारें थीं। उनमें से एक चट्टान पर फूल ही फूल थे — जैसे नदी के पानी पर तैरते हों! मिनू को यह देख कर बहुत मज़ा आया। वह धीरे-धीरे आगे बढ़ी। लाल, गुलाबी, बैंगनी फूल — कितने सुंदर रंग थे उनके!
इतने में उसकी टक्कर एक अजीब मछली से हो गई। उसका मुँह घोड़े जैसा था और पेट पर एक थैली थी जिसमें छोटे-छोटे बच्चे बैठे थे। मिनू को थोड़ी हँसी आ गई।
"आप कौन हैं?" उसने पूछा। लेकिन वह पीली मछली बिना कुछ कहे धीरे-धीरे आगे बढ़ गई।
इतने में उनके बीच से एक जीव तिरछा-तिरछा चलता हुआ गुज़र गया। वह अपनी मोटी-मोटी आँखों से मिनू को देख रहा था। अब मिनू डर गई। वह भागकर कछुआ दादा के पास खड़ी हो गई।
"डर मत, वह तो केकड़ा है! उसके पीठ पर मेरी तरह सख़्त कवच होता है। इसलिए दुश्मन उस पर हमला नहीं कर सकते। उसके छह या कभी-कभी आठ पैर भी होते हैं। फिर भी बेचारे को सीधे चलना नहीं आता। उसके मुँह के पास दो पंजे होते हैं — जिनसे वह अपना बचाव करता है और शिकार भी पकड़ता है।"
"अब तुम मेरे साथ चलो। हम बहुत दूर और बहुत गहराई में चलेंगे। वहाँ बहुत अंधेरा होता है, क्योंकि इतनी गहराई में रोशनी नहीं पहुँचती। वहाँ बहुत बड़े-बड़े मछलियाँ तैरती हैं। कुछ मछलियों के शरीर से रोशनी भी निकलती है। चलो, मज़ा आएगा!"
"नहीं बाबा!" डरकर मिनू बोली, "मुझे तो अपनी माँ के पास जाना है।"
कछुआ दादा हँसे और उसके साथ चल दिए। रास्ते में कई जगह जाल बिछे हुए थे। उन्हें बचाते हुए वे मिनू को फिर से नदी में छोड़ आए।
अहा! नदी के मीठे पानी का स्पर्श मिनू के शरीर को हुआ। उसने दो-तीन घूँट भरे। खारा मुँह पूरी तरह धो गया।
"कछुआ दादा, चलो ना मेरे साथ," उसने ज़ोर दिया।
"नहीं मिनू। जैसे तुम्हें समुद्र पसंद नहीं आया, वैसे ही मुझे नदी पसंद नहीं। अच्छा! मैं चलता हूँ। लेकिन तुम अब घर ही जाना, ठीक है?" कहते हुए कछुआ दादा धीरे-धीरे लौटने लगे।
मिनू को थोड़ी देर के लिए बुरा लगा। कछुआ दादा ने उसे कितनी सारी मज़ेदार बातें दिखाई थीं। वह सोचने लगी — कब माँ को ये सब बताऊँगी!
"मिनूचा जलप्रवास" या पाठावर आधारित स्वाध्याय प्रश्नोत्तर
🟢 शब्दार्थ:
| शब्द | अर्थ |
|---|---|
| जलप्रवास. | पाण्यातील प्रवास |
| थंडगार | थंड |
| गोटे | छोटे गोलसर दगड |
| इवलीशी | अगदी छोटी |
| लाड | प्रेम, माया |
| गोंधळ | गडबड, अफरातफर |
| गिरक्या | चक्राकार फिरणे |
| खारट | खारट चव असलेले |
| चित्रविचित्र | वेगवेगळ्या व विचित्र प्रकारचे |
| कवच | संरक्षणासाठी असलेले कठीण आवरण |
| भक्ष्य | अन्न, शिकार |
🟢 प्रश्नोत्तर:
🟢 क्रियाकलाप (गतिविधी):
१. योग्य शब्द भरून पूर्ण करा (रिकाम्या जागा भरा):
-
मिनू होती ____________ मासळी.
-
दररोज एवढं पाणी ____________ जातं?
-
समुद्रात मिनूला एका ____________ माशाची भेट झाली.
-
कासवदादांनी तिला ____________ दाखवले.
उत्तर:
-
इवलीशी
-
समुद्रात
-
विचित्र
-
गमती
२. खालील वाक्ये बरोबर की चूक ते लिहा:
-
मिनू रोज समुद्रात पोहत असे.
-
समुद्रघोडा माशाच्या पोटाला पिशवी असते.
-
खेकड्याला सरळ चालता येते.
-
मिनू कासवदादांबरोबर खोल समुद्रात गेली.
उत्तर:
-
चूक
-
बरोबर
-
चूक
-
चूक
३. चित्रवर्णन/चित्ररेखा:
विद्यार्थ्यांनी खालीलपैकी एक चित्र काढावे –
-
मिनू आणि समुद्रातील मासे
-
कासवदादा आणि खेकडा
-
समुद्र आणि त्यातील शिंपले
४. तुम्हाला समुद्रात जायला आवडेल का? का?
(विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनेने 4-5 ओळींमध्ये उत्तर लिहावे.)

No comments:
Post a Comment