
८. कुंदाचे साहस
पावसाळ्याचे दिवस होते. झाडे, शेते सर्वच हिरवीगार झाली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते. पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता.
आज रविवार. कुंदाच्या शाळेला सुट्टी होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या. कुंदा वयाच्या आठव्या वर्षीच पोहायला शिकली होती. पाहता पाहता ती पट्टीची जलतरणपटू बनली होती. नदीकाठच्या कडूनिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हासत बागडत खेळत होत्या. दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात मग्न होत्या.
खेळता खेळता लहानगी रझिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या, ते कळलेच नाही. इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या. एवढ्यात नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला. 'धावा! धावा! लवकर या, रझिया पाण्यात पडली.' 'कुणीतरी वाचवा हो!' ही हाक कुंदाच्या कानावर पडल्याबरोबर ती धावतच नदीकिनारी पोहोचली.
आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. मुलींचा गलका वाढला होता. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली. रझिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती.
कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रझियाच्या दिशेने निघाली. तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले. 'अरेऽ अरेऽ रझिया बुडते आहे. एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार?' लोक जोरजोरात ओरडत होते, 'कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे. माघारी फीर.' जमलेली माणसे ओरडत होती. कुंदाला फक्त रझिया दिसत होती. कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता. कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. भरभर पोहत कुंदा रझियाजवळ पोहोचली. रझिया घाबरली होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. 'रझिया घाबरू नको, मी आले आहे. आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर.'
कुंदाने रझियाला काठाकडे आणले. तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता. कुंदाने त्याला धरले. सर्वांनी या दोघींना बाहेर काढले. ही बातमी गावभर पसरली.
ही बातमी रझियाच्या घरीही पोहोचली. तिची आई धावत आली. त्या दोघी सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. 'कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रझियाचा जीव वाचला. केवढी धाडसी मुलगी आहेस तू!'
रझियाने कुंदाला मिठी मारली. तोवर कुंदाचे आई-बाबा आले होते. कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतले. आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाचीच चर्चा होती. साऱ्यांच्या कौतुकाच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली.
-०-
"कुंदाचे साहस" का हिंदी अनुवाद
कुंदा का साहस
यह बारिश का मौसम था। पेड़, खेत – सब कुछ हरा-भरा हो गया था। चारों ओर आनंददायक वातावरण था। गाँव की सोना नदी में भरपूर पानी आ गया था। बारिश की वजह से नदी का प्रवाह तेज़ हो गया था।
आज रविवार था। कुंदा की स्कूल की छुट्टी थी। छुट्टी का दिन होने के कारण कुंदा और उसकी सहेलियाँ नदी के किनारे खेलने गई थीं। कुंदा ने आठ साल की उम्र में ही तैरना सीख लिया था। धीरे-धीरे वह एक कुशल तैराक बन गई थी। नदी किनारे नीम के एक बड़े पेड़ के नीचे सभी सहेलियाँ हँसते-बोलते खेल रही थीं। दूर खेतों में किसान और कुछ औरतें काम में व्यस्त थीं।
खेलते-खेलते छोटी रज़िया और नीला कब नदी की ओर चली गईं, किसी को पता ही नहीं चला। इधर कुंदा और उसकी बाकी सहेलियाँ खेल में मग्न थीं। तभी नीला की ज़ोर-ज़ोर से रोने और चिल्लाने की आवाज़ आई – “भागो! भागो! जल्दी आओ, रज़िया पानी में गिर गई है। कोई तो बचाओ!” यह आवाज़ कुंदा के कानों तक पहुँची, और वह दौड़कर नदी के किनारे पहुँची।
आसपास के लोग शोर सुनकर नदी की ओर दौड़ने लगे। लड़कियों की चीख-पुकार बढ़ती जा रही थी। कुंदा दौड़कर किनारे पर पहुँची। उसने देखा कि रज़िया पानी में डूबती-उतराती तेज़ प्रवाह में बहती जा रही है।
कुंदा ने झट से नदी में छलाँग लगा दी और रज़िया की ओर तैरने लगी। इतने में लोग वहाँ इकट्ठा हो गए। वे ज़ोर से चिल्लाने लगे – “अरे! रज़िया डूब रही है, इतनी सी कुंदा उसे कैसे बचाएगी?” “कुंदा, पानी का बहाव तेज हो रहा है, वापस आ जा।” लेकिन कुंदा को केवल रज़िया दिख रही थी। उसे किसी भी हाल में बचाना है – बस यही विचार उसके मन में था। किसी की बात उसके कानों तक नहीं पहुँच रही थी। तेज़ी से तैरती हुई कुंदा रज़िया के पास पहुँच गई। रज़िया डर गई थी। उसके मुँह और नाक में पानी चला गया था। कुंदा ने कहा – “रज़िया, डरो मत, मैं आ गई हूँ। अब मेरे हाथ को मज़बूती से पकड़ लो।”
कुंदा ने रज़िया को पकड़कर किनारे की ओर खींचा। तब तक लोगों ने एक लंबी रस्सी पानी में डाल दी थी। कुंदा ने रस्सी को पकड़ लिया और सबने मिलकर दोनों को बाहर खींच लिया। यह खबर पूरे गाँव में फैल गई।
यह खबर रज़िया के घर भी पहुँची। उसकी माँ दौड़ती हुई आई। दोनों बेटियाँ सुरक्षित देखकर उसने उन्हें गले से लगा लिया। उसकी आँखों से खुशी के आँसू बहने लगे। उसने कहा – “कुंदा, आज तेरे कारण ही मेरी रज़िया की जान बची है। तू कितनी बहादुर लड़की है!”
रज़िया ने कुंदा को गले लगाया। तब तक कुंदा के माँ-बाप भी वहाँ आ गए थे। उन्होंने गर्व और स्नेह से अपनी बेटी को गले लगाया। आज पूरे गाँव में सिर्फ कुंदा के साहस की चर्चा थी। सभी के स्नेह और सराहना से कुंदा बेहद खुश थी।
"८. कुंदाचे साहस" या पाठावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे स्वाध्याय प्रश्नोत्तरे
१. पाठ्यांशावर आधारित प्रश्नोत्तरे (लघु उत्तरे):
२. योग्य पर्याय निवडा (MCQ):
३. उत्तर लिहा (दीर्घ उत्तरे):
४. रिकाम्या जागा भरा:
-
कुंदा वयाच्या ______ वर्षी पोहायला शिकली होती.→ आठव्या
-
रझियाला पाण्यात पडल्यावर ______ मोठ्याने ओरडली.→ नीला
-
कुंदाने रझियाला ______ काठावर आणले.→ पोहून
-
गावात कुंदाच्या ______ ची चर्चा झाली.→ साहसाची
५. बोधप्रश्न (चिंतनात्मक):

No comments:
Post a Comment