१४. अप्पाजींचे चातुर्य
खूप जुनी गोष्ट. विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते. त्यांच्या प्रधानांचे नाव होते अप्पाजी. अप्पाजी फार चतुर होते.
उत्तरेकडे कलिंग राज्य होते. त्या राज्याच्या राजाला वाटले, एकदा आपणही अप्पाजींची चतुराई पाहावी म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. 'तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. त्यांचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का?'
कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती; पण ते पाठवणार कसे? त्या काळी आजच्यासारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. वाहतूक चालायची ती बैलगाड्यांमधून. बैलगाड्या कलिंग राज्यात पोहोचायला तीन महिने लागत. आपण चांगली, ताजी कोबी पाठवली, तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले.
आपली शंका त्यांनी अप्पाजींना सांगितली. अप्पाजी म्हणाले, "त्यात काय अवघड आहे? एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. त्या मातीत कोबीचे बी पेरा. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा. गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील."
राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राज्याकडे रवाना केली. गाडीवान प्रवासात रोज कोबींच्या रोपांना पाणी देत होता.
तीन महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली. त्याला आनंद वाटला. अप्पाजींचे कौतुकही वाटले.
अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी, असे कलिंगच्या राजाला वाटले. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या तीन मूर्ती मागवल्या व म्हणाले, 'या तीनही मूर्ती दिसायला सारख्या असल्या, तरी यांतली एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. या सारख्या दिसणाऱ्या तीन मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा.'
त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. अप्पाजी म्हणाले, 'मी सांगतो फरक.' त्यांनी एक लवचिक तार घेतली. ती एका मूर्तीच्या कानात घातली. तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली.
अप्पाजी म्हणाले, 'ही निकृष्ट मूर्ती.'
नंतर अप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. अप्पाजी म्हणाले, 'ही मध्यम दर्जाची मूर्ती.'
तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून-कोठूनच बाहेर पडली नाही. अप्पाजी म्हणाले, 'ही उत्कृष्ट मूर्ती.'
अप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले- 'आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली, ती निकृष्ट मूर्ती. एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो, त्याचा खरेखोटेपणा पडताळून न पाहता, जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला, तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही.' या मूर्तीचा असा अर्थ होतो.
'दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली, ही मध्यम प्रतीची मूर्ती. एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली, तर त्यात समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ.
'तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली, ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही, तर तिच्या खरेखोटपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही, तो माणूस उत्तम.' हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय.
कलिंगच्या राजाला अप्पाजींचे उत्तर मिळाले. अप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. त्याने अप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले.
- विलास गिते
"अप्पाजींचे चातुर्य" या मराठी पाठाचा हिंदी अनुवाद
अप्पाजी की चतुराई
(हिंदी अनुवाद)
बहुत पुरानी बात है। उस समय विजयनगर में कृष्णदेवराय का राज्य था। उनके प्रधान (मंत्री) का नाम था अप्पाजी। अप्पाजी बहुत चतुर थे।
उत्तर दिशा में कलिंग नाम का एक राज्य था। उस राज्य के राजा को लगा कि एक बार उसे भी अप्पाजी की चतुराई देखनी चाहिए। इसलिए उसने कृष्णदेवराय को एक संदेश भेजा –
"आपके राज्य में बहुत स्वादिष्ट पत्तागोभी पैदा होती है, ऐसा मैंने सुना है। उन्हें चखने की मेरी इच्छा है। क्या आप मेरे लिए कुछ पत्तागोभी भेजेंगे?"
कृष्णदेवराय की इच्छा थी कि वह कलिंग के राजा को पत्तागोभी भेजें; लेकिन कैसे भेजें? उस समय आज जैसी तेज रफ्तार की यातायात की सुविधा नहीं थी। परिवहन बैलगाड़ियों से होता था। बैलगाड़ी को कलिंग राज्य तक पहुँचने में तीन महीने लगते थे। यदि हम ताजी पत्तागोभी भेजें भी, तो वह कलिंग पहुँचते-पहुँचते सड़ जाएँगी – ऐसा राजा को लगा।
राजा ने अपनी शंका अप्पाजी को बताई। अप्पाजी बोले, “इसमें क्या कठिनाई है? एक बैलगाड़ी में गाड़ीवान के बैठने की जगह छोड़कर बाकी जगह में मिट्टी भरिए। उस मिट्टी में पत्तागोभी के बीज बोइए। गाड़ीवान को रोज उन पौधों को पानी देने के लिए कहिए। गाड़ी जब कलिंग पहुँचेगी, तब तक पत्तागोभी तैयार हो जाएगी।”
राजा ने अप्पाजी के कहे अनुसार एक गाड़ी में मिट्टी भर कर उसमें पत्तागोभी के बीज बोकर उसे कलिंग की ओर रवाना किया। यात्रा के दौरान गाड़ीवान रोज पत्तागोभी के पौधों को पानी देता रहा।
तीन महीने बाद वह बैलगाड़ी कलिंग राज्य में पहुँची। कलिंग के राजा को ताजी पत्तागोभी मिली। उसे बहुत आनंद हुआ। उसे अप्पाजी की बहुत प्रशंसा भी हुई।
कलिंग के राजा को लगा कि अप्पाजी की एक और परीक्षा लेनी चाहिए। उसने एक जैसे दिखने वाली तीन मूर्तियाँ मँगवाईं और कहा, “ये तीनों मूर्तियाँ देखने में एक जैसी हैं, फिर भी इनमें से एक मूर्ति घटिया है, दूसरी मध्यम और तीसरी सबसे उत्तम। इनमें से उत्तम मूर्ति कौन-सी है, यह मुझे बताइए।”
इनमें अंतर कोई नहीं समझ पाया। अप्पाजी बोले, “मैं बताता हूँ।” उन्होंने एक पतली लोहे की तार ली। वह तार उन्होंने एक मूर्ति के कान में डाली। वह तार मूर्ति के मुँह से बाहर आ गई।
अप्पाजी बोले, “यह घटिया मूर्ति है।”
फिर अप्पाजी ने वही तार दूसरी मूर्ति के कान में डाली। वह तार मूर्ति के दूसरे कान से बाहर निकल गई। अप्पाजी बोले, “यह मध्यम मूर्ति है।”
फिर उन्होंने वही प्रयोग तीसरी मूर्ति पर किया। उस मूर्ति के कान में डाली गई तार न तो मुँह से निकली, न दूसरे कान से – कहीं से भी नहीं। अप्पाजी बोले, “यह उत्तम मूर्ति है।”
अप्पाजी ने कलिंग के राजा को उसके प्रश्न का उत्तर दिया –
“आपके द्वारा मँगाई गई मूर्तियों में से एक मूर्ति के कान में डाली गई तार उसके मुँह से बाहर निकली। यह घटिया मूर्ति है। इसका अर्थ है – जो व्यक्ति कोई भी अफवाह सुनते ही, बिना जाँचे-परखे, दूसरों को बता देता है, वह खुद का और समाज का नुकसान करता है।”
“दूसरी मूर्ति में एक कान से डाली गई तार दूसरे कान से बाहर निकली। यह मध्यम मूर्ति है। इसका अर्थ है – जो व्यक्ति कोई अफवाह सुनता है और दूसरे कान से उसे निकाल देता है, उससे न समाज को फायदा होता है, न नुकसान।”
“तीसरी मूर्ति में डाली गई तार वहीं अटक गई – यह उत्तम मूर्ति है। इसका अर्थ है – जो व्यक्ति कोई बात सुनकर उसे तुरंत दूसरों को नहीं बताता, बल्कि पहले उसकी सच्चाई की जाँच करता है और बिना प्रमाण के कुछ नहीं कहता – ऐसा व्यक्ति उत्तम होता है।”
कलिंग के राजा को अप्पाजी का उत्तर पसंद आया। अप्पाजी ने तीनों मूर्तियों का स्तर सही पहचाना, इसलिए राजा बहुत संतुष्ट हुआ। उसने अप्पाजी और कृष्णदेवराय दोनों का अभिनंदन किया।
— विलास गीते
१४. अप्पाजींचे चातुर्य यावर आधारित स्वाध्याय प्रश्नोत्तर
📘 1. घटकपाठ समजून घेण्यासाठी प्रश्नोत्तर:
प्रश्न 1: अप्पाजी कोण होते?
उत्तर: अप्पाजी हे विजयनगरच्या राजा कृष्णदेवरायांचे प्रधान होते. ते खूपच चतुर होते.
प्रश्न 2: कृष्णदेवरायांना कलिंगच्या राजाने कोणता निरोप पाठवला?
उत्तर: कलिंगच्या राजाने कृष्णदेवरायांना निरोप पाठवून म्हणाले की, ‘तुमच्या राज्यात चवदार कोबी उगमते, ती मला खायला हवी आहे. काही कोबी पाठवाल का?’
प्रश्न 3: कोबी कलिंगपर्यंत ताजी कशी राहिली?
उत्तर: अप्पाजींनी कल्पक उपाय सांगितला. एका बैलगाडीत माती भरली आणि त्यात कोबीची बी पेरली. रोज पाणी घालत ती गाडी कलिंगला गेली. त्यामुळे ताजी कोबी मिळाली.
प्रश्न 4: अप्पाजींनी तीन मूर्ती ओळखण्यासाठी काय प्रयोग केला?
उत्तर: त्यांनी लवचिक तार घेऊन ती मूर्तीच्या कानात घातली. ज्या मूर्तीच्या तोंडातून तार बाहेर आली ती निकृष्ट, दुसऱ्या कानातून आली ती मध्यम, आणि कोठूनही बाहेर आली नाही ती उत्कृष्ट अशी त्यांनी मूर्ती ओळखली.
✍️ 2. स्वानुभव प्रश्न:
प्रश्न: तुम्हाला अप्पाजींमध्ये कोणते गुण आवडले?
उत्तर: मला अप्पाजींचे चातुर्य, शांतपणा, आणि समस्या सोडवण्याची कल्पक पद्धत खूप आवडली. ते नेहमी विचार करून उपाय काढतात.
💬 3. तुम्ही काय कराल?
प्रश्न: एखादी अफवा ऐकल्यावर तुम्ही काय कराल?
उत्तर: मी ती अफवा दुसऱ्यांना न सांगता आधी ती खरी आहे का ते तपासेन. खोट्या बातम्या पसरवणार नाही.
📚 4. खालील शब्दांचे अर्थ लिहा:
🔡 5. शब्दसंग्रह:
| मराठी शब्द |
अर्थ (हिंदी) |
| चातुर्य |
चतुराई |
| प्रधान |
मंत्री |
| निरोप |
संदेश |
| कुजणे |
सड़ जाना |
| बी पेरणे |
बीज बोना |
| तार |
पतली लोहे की डोरी |
🧠 6. विचार करा आणि उत्तर द्या:
प्रश्न: तोंडातून तार बाहेर येणारी मूर्ती निकृष्ट का आहे?
उत्तर: कारण अशा व्यक्ती अफवा ऐकतात आणि लगेच इतरांना सांगतात. त्यामुळे समाजात गैरसमज पसरतो.
🌟 7. उपदेश / धडा:
या पाठातून आपल्याला चातुर्य, संयम, आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचे महत्त्व शिकायला मिळते. अफवांवर विश्वास न ठेवता सत्याची खात्री करूनच बोलणे योग्य आहे.
संकल्पना, प्रस्तुति, संपादन एवं लेखन
● मच्छिंद्र बापू भिसे 'मंजीत'● ©®
शिक्षण सेवक
जिला परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर, जिला गोंदिया (महाराष्ट्र)
9730491952
सातारा (महाराष्ट्र)
-०-
No comments:
Post a Comment