''यह एक शैक्षिक ब्लॉग है, यहाँ बालक-पालक-शिक्षक आदि के लिए उपयुक्त जानकारी है. आपसे अनुरोध है कि जहाँ आवश्यकता है वहाँ तक पहुँचाने में सहायता करें।"

स्वागत

'मच्छिंद्र बापू भिसे, शिक्षण सेवक, जिला परिषद् हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर द्वारा हार्दिक स्वागत! संपर्क 9730491952 "

५. सुगरणीचे घरटे (6th - Marathi)

  

५. सुगरणीचे घरटे

शाळेच्या परिसरात असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता. अतुल, नयना, जॉन व सिमरन रोज तेथे थोडावेळ थांबायचे. सुगरण पक्षी कसे घरटे बांधतो याचे निरीक्षण करायचे. त्याच्या हालचाली त्यांचे मन मोहून टाकायच्या. 'कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध.' असे नयना नेहमी म्हणायची. तिला त्याच्या कामातला सफाईदारपणा, नीटनेटकेपणा आवडायचा. जॉनला त्याची चिकाटी तर अतुलला त्याची कष्टाळूवृत्ती भावून जायची. सिमरनला वाटायचे, 'किती मेहनती आहे हा पक्षी! आपल्या सुगरणीसाठी व पिलांसाठी एवढे सुरेख घरटे बांधतो. त्यासाठी अपार मेहनत घेतो. खरंच खूपच जबाबदार व कुटुंबवत्सल पक्षी आहे हा !'

मुले घरटे पाहत असताना गुरुजी तिथे आले. गुरुजींनी मुलांना विचारले, "काय रे मुलांनो, काय पाहत आहात?" मुलांनी घरट्याकडे बोट दाखवले अन् म्हणाले, "गुरुजी, पाहा ना! सुगरण पक्ष्याने किती छान घरटे बांधले आहे." गुरुजींनी घरट्याकडे पाहिले. ते मुलांना म्हणाले, "मुलांनो, सुगरण पक्षी नीटनेटके आणि मजबूत घरटे बांधतो. गवताच्या बारीक पण चिवट काड्या गोळा करतो आणि आपल्या चोचीने सुबक व भारी घरटे विणतो. नक्षीदार वीण पाहूनच या पक्ष्याला 'सुगरण' असे म्हणतात. अशी सुबक आकाराची सुरेख घरटी तो बांधत असतो. सुगरणमादी त्याचे निरीक्षण करते. राहण्यास योग्य व मजबूत असेल अशा घरात राहणे ती पसंत करते. निंब, बाभळीच्या झाडाच्या फांदीला हे घरटे झोक्यासारखे टांगलेले असते. वादळातही हे घरटे शाबूत राहते. त्याच्या घरट्याची सर कोणत्याही इतर पक्ष्याच्या घरट्याला येत नाही. गुरुजींनी सुगरण पक्ष्याची वाखाणणी केली.

बऱ्याच दिवसांनी पुन्हा मुले निंबाच्या झाडाजवळ आली. पाहतात तर काय सुगरण पक्ष्याचे घरटे बांधून पूर्ण झाले होते. झाडाच्या फांदीवर बसून घरट्याचे निरीक्षण करणारी सुगरण त्यात राहायला आली होती. नयना म्हणाली, "सुगरण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो, तेही चोचीने. आपल्याला असे घरटे तयार करता येईल का? किती कसबी विणकर आहे हा पक्षी!"


पाठ का हिंदी अनुवाद

बया का घोंसला

स्कूल के परिसर में स्थित नीम के पेड़ पर बया पक्षी (सुगरण पक्षी) घोंसला बना रहा था। अतुल, नयना, जॉन और सिमरन रोज़ कुछ समय वहीं रुकते थे। वे यह देखकर निरीक्षण करते कि बया पक्षी किस प्रकार घोंसला बनाता है। उसकी हरकतें उनका मन मोह लेती थीं।

“न कोई जल्दी, न कोई अफरा-तफरी, सब कुछ कितना योजनाबद्ध ढंग से करता है,” नयना अक्सर कहा करती थी। उसे उसके काम में दिखने वाला सफाई और सलीका बहुत पसंद था।

जॉन को उसकी मेहनत और लगन भाती थी, तो अतुल को उसकी परिश्रमी प्रवृत्ति। सिमरन को लगता, "कितना मेहनती पक्षी है यह! अपनी बया साथी और बच्चों के लिए इतना सुंदर घोंसला बनाता है। इसके लिए वह अपार मेहनत करता है। सच में, यह पक्षी बहुत ज़िम्मेदार और परिवार से प्रेम करने वाला लगता है!"

जब बच्चे घोंसले को देख रहे थे, तभी गुरुजी वहाँ आए। उन्होंने बच्चों से पूछा, “बच्चों, क्या देख रहे हो?” बच्चों ने घोंसले की ओर इशारा करते हुए कहा, “गुरुजी, देखिए न! बया पक्षी ने कितना सुंदर घोंसला बनाया है।”

गुरुजी ने घोंसले की ओर देखा और कहा, “बच्चों, बया पक्षी बहुत सुंदर और मजबूत घोंसला बनाता है। वह घास की पतली लेकिन मजबूत तिनकों को इकट्ठा करता है और अपनी चोंच से सुंदर व टिकाऊ घोंसला बुनता है। इसकी कलात्मक बुनावट को देखकर ही इस पक्षी को ‘सुगर्ण’ कहा जाता है। यह सुंदर आकार वाले घोंसले बनाता है। मादा बया उसका निरीक्षण करती है और उसी घोंसले को पसंद करती है जो रहने लायक और मजबूत हो। नीम या बबूल के पेड़ की शाखा पर यह झूले की तरह लटकता रहता है। आँधी-तूफ़ान में भी यह घोंसला सुरक्षित रहता है। इसके घोंसले की बराबरी कोई और पक्षी नहीं कर सकता।” गुरुजी ने बया पक्षी की खूब सराहना की।

कई दिनों बाद बच्चे फिर से नीम के पेड़ के पास आए। देखा तो बया का घोंसला पूरा बन चुका था। पेड़ की शाखा पर बैठकर निरीक्षण करने वाली बया अब उसी में रहने आ गई थी।

नयना ने कहा, “बया पक्षी कितना सुंदर और आकारबद्ध घोंसला बनाता है, वो भी केवल अपनी चोंच से! क्या हम ऐसा घोंसला बना सकते हैं? कितना कुशल बुनकर है यह पक्षी!”

-0-


"सुगर्णीचे घरटे" या पाठावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे स्वाध्याय प्रश्नोत्तर:


📌 1. योग्य पर्याय निवडा: (बहुपर्यायी प्रश्न)

प्र.1) सुगरण पक्षी आपले घरटे कोणत्या झाडावर बांधत होता?
अ. आंबा
ब. वड
क. निंब
ड. पिंपळ

प्र.2) सुगरण पक्ष्याचे घरटे कोणत्या झाडाच्या फांदीवर झोक्यासारखे लटकते?
अ. नारळ व चिंच
ब. वड व पिंपळ
क. निंब व बाभळी
ड. आंबा व फणस

प्र.3) नयनाला सुगरण पक्ष्याच्या कोणत्या गुणांची आवड होती?
अ. चिकाटी
ब. नीटनेटकेपणा
क. कष्टाळूपणा
ड. वेग


✏️ 2. योग्य जोड्या जुळवा:

A स्तंभ B स्तंभ
सुगरण पक्षी घरटे चोचीने विणतो
सुगरण मादी निरीक्षण करून घर निवडते
नयना सफाईदारपणाला दाद देते
गुरुजी माहिती देतात
झाडाच्या फांदीवर          घरटे झोक्यासारखे लटकते

🧠 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा: (लघुत्तर)

प्र.1) सुगरण पक्षी घरटे विणण्यासाठी कोणता साहित्य वापरतो?
उ: सुगरण पक्षी गवताच्या बारीक पण चिवट काड्या वापरतो.

प्र.2) सुगरण पक्ष्याच्या घरट्याची वैशिष्ट्ये कोणती?
उ: ते घरटे नीटनेटके, मजबूत, नक्षीदार व झोक्यासारखे असते. वादळातही टिकून राहते.

प्र.3) सुगरण मादी घरटे निवडताना काय पाहते?
उ: घर नीटनेटके, मजबूत आणि राहण्यास योग्य आहे की नाही हे पाहते.


🖋️ 4. संपूर्ण उत्तरे लिहा: (दीर्घ उत्तरे)

प्र.1) मुलांना सुगरण पक्ष्याचे घरटे का आवडायचे?
उ: मुलांना सुगरण पक्ष्याचे घरटे आवडायचे कारण तो ते फारच सफाईने, मेहनतीने आणि योजनाबद्ध पद्धतीने बांधत असे. नयनाला त्यातील नीटनेटकेपणा आवडायचा, जॉनला चिकाटी, अतुलला कष्टाळूपणा, तर सिमरनला तो पक्षी कुटुंबवत्सल वाटायचा.

प्र.2) गुरुजींनी सुगरण पक्ष्याबद्दल काय माहिती दिली?
उ: गुरुजींनी सांगितले की, सुगरण पक्षी गवताच्या बारीक पण मजबूत काड्यांपासून सुंदर, सुबक, नक्षीदार व मजबूत घरटे चोचीने विणतो. त्याचे घरटे झोक्यासारखे लटकते आणि वादळातही टिकते. मादी सुगरण ते घरटे पाहूनच त्यात राहते.


💡 5. खालील वाक्यांचे अर्थ स्पष्ट करा:

(1) "कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध."
अर्थ: सुगरण पक्षी घाईगडबड न करता शांतपणे आणि योजनाबद्ध पद्धतीने आपले घरटे बांधतो.

(2) "त्याच्या घरट्याची सर कोणत्याही इतर पक्ष्याच्या घरट्याला येत नाही."
अर्थ: सुगरण पक्ष्याचे घरटे इतके सुंदर व मजबूत असते की दुसऱ्या कोणत्याही पक्ष्याचे घरटे त्याच्या तोडीचे नसते.


🎨 6. कृती आधारित प्रश्न:

प्र.1) तुम्ही सुगरण पक्ष्याचे घरटे पाहिले आहे का? ते पाहून तुम्हाला काय वाटले?
(स्वत:चे उत्तर लिहा)

प्र.2) एखाद्या प्राण्याचे किंवा पक्ष्याचे निरीक्षण करून त्यावर ५ ओळी लिहा.
(उदाहरणार्थ: मुंग्या, कोळी, पोपट इ.)



संकल्पना, प्रस्तुति, संपादन 
एवं लेखन

● मच्छिंद्र बापू भिसे 'मंजीत'● ©®
शिक्षण सेवक
जिला परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर, जिला गोंदिया (महाराष्ट्र)
9730491952
सातारा (महाराष्ट्र)

-०-

No comments:

Post a Comment