''यह एक शैक्षिक ब्लॉग है, यहाँ बालक-पालक-शिक्षक आदि के लिए उपयुक्त जानकारी है. आपसे अनुरोध है कि जहाँ आवश्यकता है वहाँ तक पहुँचाने में सहायता करें।"

स्वागत

'मच्छिंद्र बापू भिसे, शिक्षण सेवक, जिला परिषद् हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर द्वारा हार्दिक स्वागत! संपर्क 9730491952 "

२. माझा अनुभव (6th - Marathi)

२. माझा अनुभव


वार्षिक परीक्षा संपली. मी आणि रिमा घरी आलो. घरी पोहोचताच आईने सांगितले, "उद्या आपल्याला आगगाडीने मामाच्या गावाला जायचे आहे." रिमाने आनंदाने उड्या मारल्या. पायांतले पैंजण छुमछुम वाजवत ती घरभर फिरली.


मामाच्या गावाला जाण्यासाठी आम्ही सकाळी निघालो. आगगाडीत बसलो. आगगाडी झुकझुक करत चालली होती. खिडकीत बसलेल्या रिमाचे केस भुरभुर उडत होते. खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे तिचे डोळे लुकलुकत होते. तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता. आई वाचत असलेल्या पुस्तकाची पाने हवेने फडफडत होती. ती वाचनात तल्लीन झाली होती. मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो. थंडगार वाऱ्याच्या झुळका अंगावर झेलू लागलो.


तेवढ्यात माझे लक्ष माझ्या शेजारी बसलेल्या मावशींकडे गेले. त्यांच्या मांडीवर बसलेले छोटेसे बाळ माझ्याकडे पाहून खुदकन हसले. मी बाळाला मांडीवर घेतले. ते खिडकीतून पळणारी झाडे टुकुटुकु पाहू लागले. पाहता पाहता ते गाढ झोपले.


स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामा आला होता. रिमाने पळत पळत मामाला गाठले. आम्ही बैलगाडीत बसलो. बैलांच्या गळ्यांतील घुंगूरमाळा खुळखुळ वाजत होत्या. बैलगाडीच्या चाकांचा खडखड आवाज तालात येत होता. आम्ही घराच्या रस्त्याला लागलो. तोवर सायंकाळची वेळ झाली होती. पानांची सळसळ, नदीच्या पाण्याची खळखळ ऐकू येऊ लागली. झाडीतील पक्ष्यांची किलबिल, शेतात चरणाऱ्या गाईंचे हंबरणे, बकऱ्यांचे बेंड बेंऽ हे सारे वातावरणात मिसळून गेले होते. शेतातली पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती. मन आनंदाने थुईथुई नाचत होते.


घरी येताच तोंडभर हसून मामीने आमचे स्वागत केले. मामाची मुले राजू अन् चिमी आमचीच वाट पाहत होती. आम्ही एकमेकांना कडकडून भेटलो. आजी हळूहळू चालत, काठी टेकवत टेकवत आमच्याजवळ आली. आम्ही आजीला बिलगलो. तिने आम्हांला जवळ घेतले. आमच्या डोक्यावरून, तोंडावरून हात फिरवला. तिच्या हाताचा थरथरणारा स्पर्श खूप प्रेमळ अन् बोलका होता. आम्हांला खूप गहिवरून आले.


दुसऱ्या दिवसापासून नुसती धमाल. विहिरीवर पोहायला जाणे, शेतात बागडणे, आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या, पाडाचा आंबा तोडून खाणे, बैलगाडीतून मामाबरोबर फेरफटका मारणे, आज शेतावर, तर उद्या आमराईत मामाबरोबर फिरायला जाणे, रोज मजाच मजा.


आमची सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही. आम्ही परत गावी आलो.


हिंदी अनुवाद:


२. मेरा अनुभव

वार्षिक परीक्षा खत्म हो गई थी। मैं और रीमा घर आए। घर पहुँचते ही माँ ने कहा, “कल हमें ट्रेन से मामा के गाँव जाना है।” रीमा खुशी से उछलने लगी। उसके पैरों की पायल छनछन बजने लगी और वह पूरे घर में घूमती रही।

मामा के गाँव जाने के लिए हम सुबह निकल पड़े। हम ट्रेन में बैठे। ट्रेन धड़धड़ करती हुई चल रही थी। खिड़की के पास बैठी रीमा के बाल हवा में उड़ रहे थे। खिड़की से आ रही धूप के कारण उसकी आँखें मिचमिचा रही थीं। उसका चेहरा बहुत प्रसन्न दिख रहा था। माँ जो किताब पढ़ रही थी, उसके पन्ने हवा से फड़फड़ा रहे थे। वह पढ़ने में मग्न हो गई थी। मैं खिड़की से बाहर देखने लगा। ठंडी-ठंडी हवा की बयार शरीर को छू रही थी।

उसी समय मेरी नजर मेरे बगल में बैठी मावशी (मौसी) की ओर गई। उनकी गोद में बैठा एक छोटा बच्चा मेरी ओर देखकर मुस्कुराया। मैंने उसे अपनी गोद में लिया। वह खिड़की से भागते हुए पेड़ों को ध्यान से देखने लगा। कुछ ही देर में वह गहरी नींद में सो गया।

स्टेशन पर मामा बैलगाड़ी लेकर आया था। रीमा दौड़ते हुए मामा से जाकर मिली। हम बैलगाड़ी में बैठ गए। बैलों के गलों में बंधी घंटियाँ खनखन बज रही थीं। बैलगाड़ी के पहियों की आवाज भी लय में सुनाई दे रही थी। हम घर की ओर चल पड़े। तब तक शाम हो चुकी थी। पेड़ों की सरसराहट, नदी के पानी की कलकल, झाड़ियों में पक्षियों की चहचहाहट, खेतों में चरती हुई गायों की आवाजें, बकरियों की ‘में-में’ — ये सारी आवाजें वातावरण में मिल गई थीं। खेतों की फसलें हवा में धीरे-धीरे हिल रही थीं। मन खुशी से झूम रहा था।

घर पहुँचते ही मामी ने मुस्कुराकर हमारा स्वागत किया। मामा के बच्चे – राजू और चिमी – हमारा इंतज़ार कर रहे थे। हम एक-दूसरे से जोर से लिपट गए। धीरे-धीरे चलती हुई, हाथ में छड़ी टेकती हुई दादी हमारे पास आईं। हम दादी से लिपट गए। उन्होंने हमें अपने पास खींच लिया। उन्होंने हमारे सिर और चेहरे पर प्यार से हाथ फेरा। उनके हाथों का वह काँपता हुआ स्पर्श बहुत ही प्रेमभरा और भावुक था। हमें बहुत भावनात्मक (गहिवरून) अनुभव हुआ।

दूसरे दिन से तो बस मस्ती ही मस्ती थी! कुएँ पर तैरने जाना, खेतों में दौड़ना, आम के पेड़ पर चढ़कर कैरियाँ (कच्चे आम) और पके आम तोड़कर खाना, बैलगाड़ी में बैठकर मामा के साथ सैर करना, कभी खेत तो कभी आम के बाग में मामा के साथ घूमना — हर दिन आनंद ही आनंद।

छुट्टियाँ कब खत्म हो गईं, हमें पता ही नहीं चला। हम फिर अपने गाँव लौट आए।

-०-



“माझा अनुभव” वर आधारित विविध प्रकारचे स्वाध्याय प्रश्नोत्तर


📝 1. पाठाचा सारांश (सार)

ही गोष्ट एका मुलाच्या मामाच्या गावाला गेलेल्या सहलीबद्दल आहे. परीक्षा संपल्यानंतर आईने गावाला जाण्याची बातमी दिल्यावर रिमा खूप आनंदी झाली. आगगाडीतून प्रवास करताना आलेले अनुभव, मावशीचे बाळ, बैलगाडीतून चाललेली सफर, सायंकाळचं निसर्गसौंदर्य, मामीचं स्वागत, आजीचा प्रेमळ स्पर्श आणि मामाच्या मुलांबरोबर घालवलेला वेळ—या साऱ्या आठवणी या मुलाच्या मनात खोलवर घर करून राहतात. हा अनुभव खूप आनंददायी आणि संस्मरणीय ठरतो.


📚 2. प्रश्नोत्तर (लघुत्तर स्वरूपात)

प्र.1) परीक्षा संपल्यानंतर आईने कोणती बातमी दिली?
उ: आईने सांगितले की, दुसऱ्या दिवशी आगगाडीने मामाच्या गावाला जायचे आहे.

प्र.2) आगगाडीत रिमा कशी बसली होती?
उ: रिमा खिडकीत बसली होती आणि तिचे केस वारा लागून उडत होते.

प्र.3) मावशीच्या मांडीवर कोण होते?
उ: मावशीच्या मांडीवर एक छोटेसे बाळ होते.

प्र.4) स्टेशनवर कोण आले होते?
उ: स्टेशनवर मामा बैलगाडी घेऊन आले होते.

प्र.5) मामाच्या घरी कोणकोण होते?
उ: मामाची मुले राजू आणि चिमी, मामी आणि आजी घरात होत्या.

प्र.6) आजीचा स्पर्श कसा वाटला?
उ: आजीचा थरथरणारा स्पर्श खूप प्रेमळ आणि बोलका वाटला.


📌 3. योग्य पर्याय निवडा (बहुपर्यायी प्रश्न)

प्र.1) रिमाचे पायांत काय होते?
अ. जोडे
ब. पैंजण ✅
क. मोजे
ड. घुंगरू

प्र.2) मामाच्या गावात मुले कोणत्या झाडावर चढत होती?
अ. नारळाच्या
ब. आंब्याच्या ✅
क. लिंबाच्या
ड. चिंच

प्र.3) आगगाडी कोणत्या आवाजाने चालत होती?
अ. छुकछुक
ब. झुकझुक ✅
क. धडधड
ड. पाव पाव


📖 4. शब्दार्थ (मराठीत अर्थ)

शब्द अर्थ
पैंजण पायात घालायचे दागिने (छुमछुम करणारे)
तल्लीन पूर्ण लक्ष देऊन गुंतलेला
झुळूक थंडगार वाऱ्याची सौम्य लहर
खुदकन हसले छान, गोड हसू दिले
खुळखुळ घुंगरांच्या आवाजाचे वर्णन
थुईथुई अत्यंत आनंदाने नाचणे/फिरणे
गहिवरून आले     भावनांनी मन भरून येणे

5. खालील वाक्यांचे अर्थ स्पष्ट करा

(1) "मन आनंदाने थुईथुई नाचत होते."
अर्थ: खूप आनंद झाल्यामुळे मन अत्यंत प्रसन्न व उत्साहित झाले होते.

(2) "आई वाचत असलेल्या पुस्तकाची पाने हवेने फडफडत होती."
अर्थ: वाऱ्यामुळे पुस्तकाच्या पानांना हालचाल होत होती.


🧠 6. तुमचे विचार (मनोगत / स्वानुभव)

प्र.1) तुम्ही मामाच्या गावाला गेलात का? तुमचा अनुभव ५ ओळींत लिहा.
प्र.2) शालेय सुट्टीत तुम्ही काय करता? २-३ ओळी लिहा.


🎨 7. कृतीकार्य

  • आगगाडी, बैलगाडी, शेत, विहीर यांची चित्रं काढा.

  • 'गावाकडचा दिवस' या विषयावर निबंध लिहा.

  • या पाठातील ५ विशेषण व त्यांचे नाम लिहा.
    (उदा. थंडगार झुळूक)



संकल्पना, प्रस्तुति, संपादन 
एवं लेखन

● मच्छिंद्र बापू भिसे 'मंजीत'● ©®
शिक्षण सेवक
जिला परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर, जिला गोंदिया (महाराष्ट्र)
9730491952
सातारा (महाराष्ट्र)
-०-

No comments:

Post a Comment