
७. उद्यानात भेटलेला विद्यार्थी
मुंबईचे चर्नी रोड उद्यान ! चर्नी रोड उद्यानात सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला यायचे. मुंबई येथील विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि विद्याव्यासंगी लेखक कृष्णाजी अर्जुन केळूस्कर गुरुजीदेखील चर्नी रोड उद्यानात रोज सायंकाळी ५.३० वाजता यायचे. उद्यानाच्या एका बाकावर बसून ते सोबत आणलेल्या पुस्तकाचे वाचन करत असत.
बाकावर बसून वाचन करणाऱ्या कृष्णाजी केळूस्कर गुरुजींच्या लक्षात आले, की थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत आहे. त्या वेळी त्यांनी त्या विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी तो कालचा विद्यार्थी तेथे पुस्तक वाचताना त्यांना दिसला. आता मात्र त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. तिसऱ्या दिवशीदेखील तोच विद्यार्थी कोणतेतरी पुस्तक वाचताना दिसला. त्या विद्यार्थ्यानेदखील गुरुजींकडे बघितले, कुणीच काही बोलले नाही.
केळूस्कर गुरुजी त्या मुलाजवळ आले. तो मुलगा वाचत होता. कुणीतरी आपल्याजवळ उभे आहे, असे त्या मुलाच्या लक्षात आल्याबरोबर त्याने गुरुजींकडे बघितले. गुरुजींनी अतिशय आपुलकीने त्याला विचारले, "बाळ तुझं नाव काय?"
"माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर." "वा ! छान नाव आहे तुझं ! तीन दिवसांपासून तुला रोज येथे बघतो. तू रोज काहीतरी वाचत असतोस. इतर मुलांसारखी तू मस्ती करताना दिसत नाहीस, म्हणून तुझी ओळख करून घेण्यासाठी मी तुझ्याजवळ आलोय."
आपल्याविषयी इतक्या प्रेमाने, स्नेहाने बोलणाऱ्या त्या गृहस्थांबद्दल भीमरावला आदर वाटला. त्याने गुरुजींना नमस्कार केला. केळूस्कर गुरुजींनी विचारले, "बाळ तू कुठं शिकतो?"
"मी एलफिन्स्टन हायस्कूल, भायखळा येथे शिकतो. शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची मला आवड आहे, म्हणून शाळा सुटल्यानंतर इथं काही वेळ पुस्तक वाचत बसतो." "वा! छान ! चांगली पुस्तके वाचली पाहिजेत." नंतर केळूस्कर गुरुजींनी भीमरावच्या कुटुंबाविषयी चौकशी केली. ते विचार करू लागले. 'हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चित वेगळा आहे. या मुलाला आपुलकी आणि मार्गदर्शनाची खरी गरज आहे. थोडावेळ थांबून ते म्हणाले, "मी विचार करत होतो, की पद्धतशीरपणे वाचन कसे करायचे हे तुला सांगावे!" "सांगा ना गुरुजी!" आतुरतेने भीमरावने विचारले.
गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे, याविषयी माहिती दिली आणि सांगितले, "मी काही लेखकांची पुस्तके तुला वाचायला देईन." "जरूर ट्या गुरुजी ! मला ती पुस्तके वाचायला आवडतील!" गुरुजींनी मोठ्या मायेने भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला. भीमरावला खूप बरे वाटले.
चर्नी रोड उद्यानामध्ये केळूस्कर गुरुजींची भीमरावशी रोज भेट होऊ लागली. गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले; त्यामुळे भीमरावच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली. आता केळूस्कर गुरुजी आणि भीमराव यांची अभेट्य गट्टी जमली होती.
केळूस्कर गुरुजींनी भीमरावची तल्लख बुद्धिमत्ता लक्षात घेऊन महाविद्यालयीन आणि पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाडमहाराजांकडे स्वतः शिफारस केली; त्यामुळेच भीमराव यांना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून भीमराव जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विद्याविभूषित डॉ. बाबासाहेब आंबेडकर झाले! अशा या उच्च विद्याविभूषित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली
-०-
"७. उद्यानात भेटलेला विद्यार्थी" या मराठी पाठाचा हिंदी अनुवाद
उद्यान में मिला विद्यार्थी
मुंबई का चर्नी रोड उद्यान! शाम के समय इस उद्यान में कई नागरिक सैर करने आते थे। मुंबई के विल्सन हाईस्कूल के प्रधानाचार्य और विद्वान लेखक कृष्णाजी अर्जुन केळूस्कर गुरुजी भी रोज शाम ५:३० बजे चर्नी रोड उद्यान में आते थे। वे वहाँ की एक बेंच पर बैठकर अपने साथ लायी हुई पुस्तक पढ़ते थे।
गुरुजी को एक दिन यह ध्यान में आया कि थोड़ी दूर एक विद्यार्थी भी पुस्तक पढ़ रहा है। उन्होंने उस समय ज़्यादा ध्यान नहीं दिया। लेकिन अगले दिन वही विद्यार्थी फिर पुस्तक पढ़ते हुए दिखा। अब गुरुजी को जिज्ञासा हुई। तीसरे दिन भी वह विद्यार्थी कोई पुस्तक पढ़ते हुए दिखा। उस विद्यार्थी ने भी गुरुजी की ओर देखा, लेकिन दोनों में कोई बात नहीं हुई।
"मैं एलफिन्स्टन हाईस्कूल, भायखळा में पढ़ता हूँ। पाठ्यपुस्तकों के अलावा अन्य पुस्तकें पढ़ने का मुझे शौक है, इसलिए स्कूल के बाद यहाँ आकर कुछ समय किताबें पढ़ता हूँ।"
अब चर्नी रोड उद्यान में गुरुजी और भीमराव की रोज़ मुलाकात होने लगी। गुरुजी उसे अच्छे लेखकों की किताबें पढ़ने को देने लगे। इससे भीमराव का वाचन अधिक गहरा और व्यापक होता गया। अब गुरुजी और भीमराव के बीच गहरी दोस्ती हो गई।
लेखक: डॉ. प्रदीप आगलावे
"७. उद्यानात भेटलेला विद्यार्थी" या पाठावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे स्वाध्याय प्रश्नोत्तरे
१. पाठ्यांशावर आधारित प्रश्नोत्तरे:
२. योग्य पर्याय निवडा (बहुपर्यायी प्रश्न):
३. बोध प्रश्न (चिंतनात्मक प्रश्न):
४. रिकाम्या जागा भरा:
-
भीमराव ________ हायस्कूलमध्ये शिकत होता.→ एलफिन्स्टन
-
केळूस्कर गुरुजींनी भीमरावला ________ महाराजांकडे शिफारस केली.→ सयाजीराव गायकवाड
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची ________ लिहिली.→ राज्यघटना

No comments:
Post a Comment